ऋषी सहारे
संपादक
वडसा देसाईगंज वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या उसेगाव या गाव जवळील जंगलात गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजता च्या दरम्यान घडली . वाघाच्या हल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव प्रेमपाल तुकाराम प्रधान वय 45 असून ऊसेगाव येथील रहिवासी आहे . या गावात गणेश मंडळाच्या पंडाल मध्ये लावलेल्या माईक वरून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावातील लोकांना जंगलात जाऊ नये , तसेच मागील दोन – तीन दिवसापासून जंगलामध्ये वाघाचा अस्तित्व असल्याचे दिसून आलेले आहे , अशी मुनादी सकाळी सात वाजता च्या दरम्यान दिली होती , मृतकाने ही मुनादी आपल्या कानाने ऐकून सुद्धा घरातील काड्या आणि झाडणी बनवण्याच्या मोहापायी जंगलामध्ये जाताच वाघाने अचानकपणे झडप घालून त्याला जागीच ठार केले .
वनविभागाने वाघा चा बंदोबस्त करावा व जंगलावर आधारित असलेल्या मानव प्रानी जगावं या करीता प्रयत्न करावा अशी मागणी होत आहे असेच जर बळी होत राहिले तर जंगलावर अवलंबून असलेल्या नि जगावं कस असा प्रश्न उपस्थित होत आहे.