उपजाऊ शेत जमीन अधिग्रहण करून शेतकऱ्यांना भिकेला लावू नका. — रमेश कारामोरे प्रहार जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात शेतकरी आंदोलन करण्यासाठी सज्ज.

      कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- तहसील येथे आमडी नयाकुड व पटगोवारी येथिल उपजाऊ शेती एमआयडीसी मध्ये अधिग्रहित करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.या तीन्ही गावातील शेतकऱ्यांची सर्वच सुपीक शेत जमीन अधीग्रहीत करण्याचा घाट स्थानीक आमदार यांनी निवडणूक डोळ्या पुढे ठेवून घातला आहे.

       परिसरातील पारशिवनी तालुकातील आमडी,चीचभुवन, नयाकुंड पारशिवनी तालुक्यातील या गावातील शेतकऱ्यांची जवळ जवळ २ हजार ५०० एकर सुपीक जमीन एमआयडीसी साठी स्थानीक आमदार जोर जबरदस्तीने अधीग्रहण करून या शेतकऱ्यांना भिकेला लावण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप नागपूर प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कारामोरे यांनी केला आहे.

        जबरदस्तीने अधिग्रहित करण्याच्या प्रकारावरुन या भागातील शेतकरी संतप्त झाले असुन येथील समता बुद्ध विहारात शेतकऱ्यांनी एकत्र येत या विरुद्ध लढा देण्यासाठी बैठक आयोजित केली होती. 

       त्यासाठी प्रहार जनशक्ति संगठनचे जिल्हा अध्यक्ष रमेश कारामोरे यांना आवर्जून निमंत्रित केले होते.या भागातील सर्व अर्थ व्यवस्था ही शेती वर अवलंबून असून ही शेतीच गेली तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न येथील शेतकरी,शेतमजूर, महिला यांना पडला आहे.

     ज्ञवास्तविक पाहाता एमआयडीसी येणे म्हणजे उद्योग येणे असे होते असा खोटा व भ्रामक प्रचार आमदार व त्यांचें समर्थक करत आहेत.मात्र एमआय डीसी ही फक्तं उद्योगा साठी लागणारी सोई सुविधा निर्माण करणारी संस्था आहे.एमआयडीसी एक ही उद्योग लावत नाही.

      आज मौदा येथे कोणतीही एमआयडीसी नसतांना अनेक उद्योग या भागात आहेत.त्या साठी उद्योजकांनी शेतकऱ्यांशी सरळ वाटा घटी करून शेती घेतली आहे.आज नागपूर चा मिहान साठी अशीच हजारो एकर सुपीक शेत जमीन अधिग्रहित करण्यात आली होती.

     मात्र अद्यापही तिथे उद्योग न आल्याने ती सुपीक शेत जमीन तशीच बंजर होऊन पडली आहे. पारशिवणी येथे ही एमआयडीसी साठी सुपीक शेत जमीन अधिग्रहित करण्यात आली.

      मात्र फक्तं ४ उद्योग सुरू आहेत.उर्वरित ४४ उद्योग हे फक्त कागदावरच आहेत.उद्योजकांनी उद्योग लावण्याचा नावावर जागा नाममात्र दरात आपल्या घशात घातली आहे.

      रामटेक,कन्हांन,टेकाडी येथे ही एमआयडीसी साठी सुपीक शेत जमीन अधिग्रहित करण्यात आली होती.मात्र एक ही उद्योग सुरू केला गेला नाही.

पुढे विधानसभेची निवडणूक आहे,लोकसभा निवडणुकीत स्थानीक आमदार यांना गावा गावात रोजगाराचा नावाने प्रश्न विचारले गेले.त्यामुळे पुढील निवडणुकीत आपल्याला रोजगाराचा नावाने निवडणूक जळ जाणार आहे हे ओळखून एमआयडीसीच्या नावाने रोजगार आणत आहे.

     असा खोटा भ्रम स्थानीक आमदार यांना पसरवून लोकांची मत घ्यायची आहेत.त्यासाठी स्थानीक आमदार या भागातील शेतकऱ्यांचा जीवावर उठले आहेत काय?असा प्रश्न सुध्दा शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

       कसही करत निवडणूक आचार संहिता लागायच्या आधी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री ,उद्योग मंत्री यांना आणून एमआयडीसीचे भूमिपूजन करायचे आणि त्याची फसवी मार्केटिंग सम्पूर्ण विधानसभा क्षेत्रात करायची आणि मत घेऊन पुन्हा निवडणुन यायचं असा स्थानीक आमदार यांचा बेत आहे असल्याचा गंभीर आरोप प्रहार जिल्हा अध्यक्ष रमेश कारामोरे यांचा आहे.

       मात्र या एमआयडीसीत कोणता उद्योग येणार आहे? त्यात किती लोकांना रोजगार मिळणार आहे? रोजगार कोणत्या स्वरूपाचं राहणार आहे? स्थाई रोजगार मिळणार आहे की ठेकेदारीत? याचबरोबर ८ ते १२ हजार रुपये महिन्यात आयुष्य भर राबावे लागणार आहे याचं कोणतीच उत्तर स्थानीक आमदार देत नाही आहे.

      या शेतीवर शेतकऱ्यानं सोबतच गावातील महिला शेत मजूर,कृषी केंद्र चालक,ट्रॅक्टर चालक असे अप्रत्यक्ष उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांचे काय?याचं उत्तर मात्र स्थानिक आमदार यांचा कडे नाहीत.फक्तं आणि फक्तं खोटं फसव आणि भ्रामक राजकारण करायचं स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी लोकांचे नुकसान झाले तरी चालेल,खोट्या प्रयत्नांतून प्रत्येक निवडणुकीत लोकांची मत घ्यायची आणि निवडून यायचं असा खेळ स्थानीक आमदार करतात असी स्थानीक शेतकऱ्यानं ची भूमिका असुन आमच्या सुपीक शेत जमीनिवर एमआयडीसी नकोच असे म्हणत या विरुद्ध रस्त्यांवर उतरण्याची भूमिका या बैठकीत शेतकऱ्यांनी घेतली नाही.