रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी येथील अर्धवट राहिलेल्या बुद्धविहाराचे काम पूर्ण करण्यासाठी डॉ.सतीश वारजूकर यांनी 21 हजार रुपयाची तात्काळ आर्थिक मदत दिल्यामुळे बौद्ध पंच कमिटीने त्यांचे मनपूर्वक स्वागत केलेले आहे.
चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी येथील बौद्ध समाज बांधवांनी स्वखर्चातून बौद्धविहाराचे बांधकाम करण्याचे ठरविले होते.त्यानंतर संपूर्ण समाज बांधवांनी बौद्धविहारच्या बांधकामासाठी आर्थिक मदत केली.जमलेल्या वर्गणीतून बांधामांला सुरुवात करण्यात आली.गोळा केलेल्या निधीतून बांधकाम स्लॅब लेवल पर्यंत गेले.
परंतु पुढे काम करन्यासाठी त्यांना आर्थिक अडचण निर्माण झाल्याने काम पूर्ण कसे करायचे हा प्रश्न गावकऱ्यासमोर निर्माण झाला होता.
याच वेळी गाव समस्या एकूण घेण्यासाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ.सतिश वारजुकर हे पिंपळनेरी येथे गेले होते.त्यावेळी बौद्ध विहार बांधकामाची पाहणी केली.
गावकऱ्यांनी आर्थिक अडचण निर्माण झाल्याचे सांगितल्यावर त्यांनी स्वनिधीतून त्यांना 21 हजार रुपयाची आर्थिक मदत केली व बांधकाम पूर्ण करण्याचे सांगितले.
उपस्थित समाज बांधवांनी त्यांचे स्वागत करून आभार मानले.यावेळी चिमूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ.विजय गावंडे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विवेक कापसे,चिमूर शहराचे अध्यक्ष अविनाश अगडे,उपस्थित होते.