रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मैदान ब्रम्हपुरी येथे नवनिर्वाचित खासदार गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र डॉ.नामदेव किरसान सह राज्यांचे विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार,यांच्या हस्ते ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व त्याना घडवणाऱ्या पालकांचा जाहीर सत्कार तथा मार्गदर्शन सोहळा ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित करण्यात आला होता.
सदर मेळाव्याला गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्यासह विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार,आमदार पदवीधर मतदार संघ एड.अभिजीत वंजारी,सुप्रसिद्ध व्याख्याते युजवेंद्र महाजन,संस्थापक अस्पायर दि इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन डेव्हलपमेंट सचिन बुरघाटे,यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना उचित मार्गदर्शन केले.
या मेळाव्या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा आदर भावाने प्रसन्न वातावरणात सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष परिवहन सेल रुपेश टिकले,जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे,तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी ब्रह्मपुरी खेमराज तिडके,तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी सिंदेवाही रमाकांत लोंधे,डॉ.राजेश कांबळे,विलास विखार,प्रमोद चिमूरकर,जगदीश पिलारे,प्रभाकर सेलोकर,डॉ.थानेश्वर कायरकर,मंगला लोनबले,हितेंद्र राऊत,सोनू नाकतोडे,सुरज मेश्राम,योगिता आमले,सतीश विधाते,रमेशजी चौधरी,नदीम नाथांनी,गौरव येनप्रेड्डीवार,चारुदत्त पोहाने,कुणाल ताजने,विपुल एलटीवार तथा सर्व सेलचे अध्यक्ष,पदाधिकारी,कार्यकर्ते, विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित मोठ्या संख्येने होते.