रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर :- सन २०२२ मध्ये खतांच्या गटाराचे पाणी टाकिच्या प्रवाहातुन माकोना गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी घरोघरी नळच्या माध्यमातून गेले आणि त्यामुळे माकोना गावातील अनेक मुले – मुली,लाहनशे बाळ,मोठे माणूस रोगाने आजारी झाले होते.
या गंभीर घटनाक्रमाला अनुसरून पुढाकार घेत जगदिश मेश्राम भिम आर्मी संविधान रक्षक दल चिमुर तालुका अध्यक्ष यांनी आंदोलन करुन स्वच्छ परीसर करण्यास भाग पाडले होते.
आता नळ योजना द्वारे पुरवठा करण्यात येत असलेले पाणी दुषित येत असल्याने पुन्हा नागरिक आजारी पडतांना दिसुन येत आहेत.लेखी स्वरूपात आश्वासन दिले होते की आरो फिल्टर बसणार.यानुसार भिम आर्मी संविधान रक्षक दल चिमुर तालुका अध्यक्ष जगदीश मेश्राम यांनी पाठपुरावा करून आरो मंजुर केला होता.
मात्र ठेक्याचा अभावी आरो बसवण्यात आला नाही.त्यामुळे आता भिम आर्मी संविधान रक्षक दल चिमुर तालुका अध्यक्ष जगदीश मेश्राम हे पंचायत समिती चिमुरचे विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी हे माकोना वासियांच्या आरोग्य सुरक्षेकडे वारंवार दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे माहीती त्यांनी दिली आहे.
माकोना गावात बंद पडलेला आरो भंगार मध्ये विकण्याची परवानगी संरपंच्यांनी द्यावी अशी सुध्दा मागणी केली आहे.