ऋषी सहारे
संपादक
आरमोरी. गडचिरोली वरून मोटारसायकलने परत आपल्या स्वगावी जात असताना रानडुकराने मोटार सायकलला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि. ८ जुलैला दुपारी 2 वाजताचे सुमारास पोरला पासून १ किमी अंतरावर पोरला -वडधा मार्गावर घडली.
मृतक महिलेचे नाव विमल धोंडूजी खेवले रा.बोरीचक वय वर्षे (५५) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार, दिनांक ८ जुलैला सकाळी ७ वाजताच्या सुमारास मृतक विमलबाई ही आपला मुलगा रोहिदास धोंडूजी खेवले वय ३३वर्षे व नातीन कु.निशा रोहिदास खेवले वय वर्षे १० यांच्यासोबत स्वतःच्या मोटारसायकलने आपल्या बहिणीला गडचिरोली येथे भेट घ्यायला गेली होती.गडचिरोली वरून परत आपल्या स्वगावी म्हणजेच बोरीचक येथे जात असताना पोरल्या पासून १ किमी. अंतरावर रानडुकराने त्यांची मोटारसायकल क्र. MH-33,Z-9729 ला जबर धडक दिली. त्यामुळे मोटारसायकल वर स्वार असणारे हे तिघेही जण खाली पडले.यात विमलबाई हिला जबर मार बसल्याने तिचा घटनास्थळी मृत्यू झाला.तर विमालबाईचा मुलगा रोहिदास व नातीन निशा हिला किरकोळ मार लागला.आरमोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.तसेच ह्या घटनेचा मर्ग दाखल केला आहे.अधिक तपास सहाय्यक फौजदार एकनाथ घोडाम हे करीत आहेत.