नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

साकोली : महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार व इतर इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळ अंतर्गत ( ०८ जुलै ) ला साकोलीत श्री संत लहरीबाबा मठ देवस्थान सभागृहात कामगारांना पेटी ( सुरक्षा किट ) व स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. 

      साकोली विधानसभातील तिन्ही लाखांदूर, लाखनी व साकोली तालुक्यातील नोंदणी कामगारांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कामगार पेटी व स्मार्ट कार्डचे वाटप केले गेले. याप्रसंगी जिल्हा परिषद भंडारा समाजकल्याण सभापती मदन रामटेके, जि. प. सदस्या शितल राऊत, पं. स. सदस्या अर्चना इळपाते, जि. प. सदस्या वर्षा मेंढे, राष्ट्रपाल मेश्राम प्रतिनिधी लाखांदूर बांधकाम कामगार हे हजर होते. संचालन मार्कंडराव भेंडारकर जिल्हा अध्यक्ष असंघटीत कामगार तथा बांधकाम कल्याणकारी मंडळ भंडारा प्रतिनिधी यांनी केले. आपल्या प्रास्ताविक व अध्यक्षीय भाषणात जि.प.स. मदन रामटेके व जिल्हाध्यक्ष मार्कंडराव भेंडारकर यांनी सांगितले की प्रत्येक बांधकाम कामगारांना त्यांच्या मुलभूत योजना त्यांच्या मुलीचे विवाह करीता ५१ हजार,  घर बांधणीसाठी ४.५ लाख, मुलांच्या शैक्षणिक सर्व योजनांसाठी विविध स्तरांवर लाखोंचे अर्थसहाय्य, महिला कामगारांना सिजर डिलेव्हरीसाठी २० हजार, नॉर्मल डिलेव्हरी साठी १५ हजार अश्या अनेक शासकीय लाभांचा कामगारांना फायदा मिळत असून कामगारांनी आपली नोंदणी करावी व कामगार पेटी व स्मार्ट कार्डचे धारक व्हावे. कार्यक्रमाला किशोर तिडके व्यवस्थापक, शिवराय नेट कैफे साकोलीचे आदित्य चेडगे, लाखनी कार्यालय संचालिका दिनाक्षी तिरपूडे, मदन साठवणे यांनी कार्ड वाटप व सुरक्षा किट वितरणला अथक परिश्रम घेतले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com