वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे

 

वाशिम:- अनुभव शिक्षा केंद्र वाशिम व विवेकानंद युवा मंडळ लाडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दि.8/7/2022 रोजी जि.प.विद्यालय कामरगांव येथे दहावी व बारावी परीक्षेतून गुणवत्ता प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमांमध्ये दहावी व बारावी नंतर पुढे काय करावे यासंदर्भात युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत शिल्ड, प्रमाणपत्र, वृक्ष देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांमध्ये अनुभव शिक्षा केंद्र बद्दल माहिती देण्यात आली.तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.सौ.अरुणाताई देशमुख (प्राचार्य) प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री.चंद्रशेखर डोईफोडे (जि.प.सदस्य वाशिम) मा.श्री.सतीश भगत(अनुभव साथी)मा.श्री.विशाल ठाकरे (उपसरपंच बेंबळा) मा.श्री.आशिष धोंगडे(अनुभव शिक्षा केंद्र अमरावती वाशिम जिल्हा प्रशिक्षक)या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते. मार्गदर्शिका कार्यक्रमांमध्ये युवकांनी आपलं ध्येय कडे वाटचाल करण्यासाठी यशाची पहिली पायरी गाटने खूप महत्त्वाचे यासंदर्भामध्ये युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.श्री.घुले सर यांनी केले.या सत्कार सोहळा कार्यक्रमांमध्ये रुईकर,

राठोड,भोंडाने व सर्व शिक्षकवृंद या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आशिष धोंगडे यांनी केले.अशा प्रकारे हा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.

 

आशिष धोंगडे

वाशिम प्रतिनिधी

दखल न्युज भारत

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com