युवराज डोंगरे/खल्लार
खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील चंद्रपूर येथील 17 वर्षीय युवती दि 2 जुलैपासुन बेपत्ता झाली होती.सदर मुलीचे अज्ञात व्यक्तीने फुस लाऊन अपहरण केले असावे अशी तक्रार मुलीच्या आईने खल्लार पोलिसात दाखल केली होती. त्या तक्रारीवरुन खल्लार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
बेपत्ता युवतीस खल्लार पोलिसांनी शोधून काढून तिच्या आईच्या स्वाधिन केले असुन याबाबतचा अधिक तपास ठाणेदार विनायक लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार रामरतन चव्हान करीत आहेत.