पुणे जिल्हा प्रतिनिधी
स्नेह ह्या लहान मुलांच्या इंग्रजी शाळेत महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त शाळेतील चिमुकल्यांना वारकरी वेशभूषेत बोलवून आज दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिमुकल्यांनी देखील आवडीने सहभागी होऊन आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा जपली.देश जरी आधुनिकीकरणाकडे चालला आहे, तरी आपल्या देशात परंपरा तसेच इतिहास आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दरवर्षी आषाढ महिन्यात पंढरपूरची वारी असते, ह्यामध्ये वारकरी तहान भूक विसरून सहभागी होऊन नामस्मरणात दंग असतात.अलिकडे महाराष्ट्रातील तर नव्हे जगातून लोक वारीमध्ये सहभागी होऊन आनंद घेत आहेत.परंतु आपल्या महाराष्ट्रातील मुल आता मराठी शाळेऐवजी इंग्रजी शाळेत जाऊ लागल्याने आपली परंपरा विसरत चालली असल्याने, आता शाळांनीच पुढाकार घेतला आहे. आता प्रत्येक शाळेत आपल्या महाराष्ट्राची परंपरा जोपासली जात आहे. शिक्षण जरी इंग्रजी माध्यमातून असले तरी आपली परंपरा टिकून रहाणे हे महत्त्वाचे कारण आपल्या परंपरेचा जगात अभ्यास केला जात आहे.