अमरावती जिल्हा प्रतिनिधी,

युवराज डोंगरे

अमरावती जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांना आता जागृत करुन त्यांना शिवसेनेच्या घटनेची माहिती देऊन विचारांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे असे मत युवासेना उपजिल्हाप्रमुख अंकुश कावडकर यांनी व्यक्त केले

राज्यात नुकत्याच घडलेल्या घटनेवरून काही बिनडोक मंडळी असे म्हणत आहेत कि शिवसेनेचे आता दोन गट पडले आहेत खरी शिवसेना कोणती?मुळात हे लोक सामान्य नागरिक व शिवसैनिकांना मूर्ख समजत आहेत पण तसे अजिबात नाही.

आजचा शिवसैनिक हा अत्यंत अभ्यासु आहे त्याला कायदा कळते. तो फक्त रस्त्यावरील लढाई तर डोक्याचीही लढाई लढू शकतो डोक फक्त आम्हालाच आहे हा काही लोकांचा भ्रम आहे तो त्यांनी दूर करावा.

शिवसेना या पक्षाची प्रादेशिक पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडे अधिकृत नोंद आहे पक्षाला अधिकृत चिन्ह आहे शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार पक्षातील कोणत्याही पदाधिका-यांची नियुक्ती तसेच कोणत्याही व्यक्तीची हकालपट्टी पक्षप्रमुख करु शकतात तसे अधिकार त्यांना आहेत.

सध्या जे 40 आमदार आहेत ते फक्त विधिमंडळ सदस्य आहेत ते म्हणजे शिवसेना पक्ष नव्हे त्या 40 आमदारांचा शिवसेना पक्षावर कोणताही अधिकार नाही हे नागरिकांनी समजून घेणे महत्वाचे आहे. शिवसेना पक्ष संघटन आणि विधिमंडळ सदस्य या दोन वेगवेगळ्या बाजु आहेत हे समजून घेणेही तेवढेच महत्त्वाचे असल्याचे मत अंकुश कावडकर यांनी व्यक्त केले आहे

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com