ऋषी सहारे
संपादक
कोरची – सरपंच सचिव यांनी ग्रामपंचात स्तरावरुन राबविण्यात येणारे विविध विकासात्मक कामे मार्गी लावावे परस्पर असे आवाहन गट विकास अधिकारी राजेश फाये यांनी केले . पंचायत आयोजित सरपंच व सचिव यांच्या आढावा सभेत ते बोलत होते . कामे विहीत वेळेत समिती सभागृहात शासनाच्या अनेक विकासात्क योजना ग्रामपंचाय स्तरावरुन राबविण्यात येत असतात , शासन स्तरावरुन राबविण्यात येणा – या विविध योजनांची प्रभावी अमलबजवाणी करणे सोईचे व्हावे तसेच गावस्तरावरील समस्यांचे निराकरण करतांना सरपंचाना येणा – या अडचणी सोडविण्या च्या अनुषंगाने पं.स सभागृहात आयोजित सरंपच व सचिव यांची संयुक्त सभा घेण्यात आली . या सभेत गट विकास अधिकारी यांनी शासन स्तरावरुन राबविण्यात येणा – या विविध योजनांची माहिती दिली तसेच शासन स्तरावरुन प्राप्त निर्देशाच्या अधिन राहुन नियोजित आराखडयाप्रमाणे विकासात्मक कामे विहीत वेळेत पूर्ण करावे असे आवाहन केले . यावेळी पावसाळाच्या सुरवातीला साथ रोगांचा प्रादुर्भाव होवू नये म्हणुन नियमित क्लोरिनेशन करुन , गावातील सांडपाणी व घनकच – याचे व्यवस्थापन करण्यात यावे याबाबत उपस्थित ग्रामपंचात सचिवाना सुचना दिल्या , तसेच स्वछ भारत मिशन कार्यक्रमा अंतर्गत शौच्छालयाचा नियमीत वापर करण्यासंबंधान नागरीकांना मार्गदर्शन करावे , तसेच प्रधान मंत्री आवास तसेच शबरी व रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना दैनदीनी भेटी देवून घरकुल बांधकाम पुर्ण करावे , असे आवाहन केले सदर सभेस तालुक्यातील सर्व सरपंच व सचिव उपस्थित होते .