युवराज डोंगरे/खल्लार
नुकतीच जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक अमरावती ची निवडणुक संपन्न झाली त्या निवडणुकीत समता पँनल च्या वतीने VJNT मधुन जिल्हयातुन सर्व पँनल पेक्षा जास्त मताने संजय तुळशिराम नागे यांनी २९१२ मते घेऊन प्रतिस्पर्धी गटातील उमेदवार ला सर्वात जास्त मताने पराभुत केले. नवनिर्वाचित संचालक संजय तुळशिरामजी नागे यांचा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा, दर्यापुर च्या वतीने त्यांच्या निवासस्थानी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे जेष्ठ नेते पंडीतराव देशमुख , संघटनेचे अध्यक्ष सतिश वानखडे ,सरचिटणीस डी.आर जामनिक संजय साखरे जेष्ठ मार्गदर्शक , सुरेंद्र पतिंगे कार्याध्यक्ष, राजेंद्र सावरकर कोषाध्यक्ष विजय पवार अध्यक्ष शिक्षक पतसंस्था, गजानन गणोदे सचिव शिक्षक पतसंस्था ,विलास पेठे यांच्या प्रमुख उपस्थित उभयंताचा शाल श्रीफळ देऊन छोटेखानी सत्कार करण्यात आला
या प्रसंगी प्रमोद कुरळकर , कैलास डहाळे , किशोर बुरघाटे ,मेमनकर, बिजवे, चव्हाण, गजानन इंगोले ,सवई सर इत्यादी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य गण उपस्थित होते.