सुनील नंदनवार

शहर प्रतिनिधी दखल न्युज भारत

आरमोरी:- नगरपरिषद ने काही दिवसाआधी कर आकारणीच्या नोटीसा लोकांना बजावल्या आहेत ज्यात मालमत्ता कर ,वृक्षकर ,अग्निशमन कर , रोजगार हमी कर ,उपयोगिता कर यासोबतच नगरपरिषदेच्या कुठल्याही प्राथमिक , माध्यमिक शाळा नसताना सुद्धा शिक्षण कराची अवाढव्य आकारणी करण्यात आलेली आहे त्यामुळे या अतिरिक्त कराचा बोजा सर्व आरमोरीकर नागरिकांना भरावा लागणार आहे नुकताच कोविड च्या महासंकटातून सावरताना एक वर्ष होत नाही तर आरमोरीकरांवर हे अस्मानी संकट येऊन पडले आहे उद्योगधंदे मंदावलेले, अवकाळी पावसामुळे होणारे शेतीचे नुकसान यामुळे सर्वसामान्य शेतकरी ,मजूर ,कामगार लोकांचे कंबरडे मोडलेले आहे त्यातच नगरपरिषद ने लावलेल्या या अवाढव्य करामुळे सर्वसामान्य नागरिक चिंतेत पडले आहेत नगरपरिषद च्या करात कपात करण्यात यावी यासाठी लोकहित संघर्ष समिती आरमोरी तर्फे दिनांक ९ जुलै २०२२ शनिवार ला वेळ दुपारी ठीक १२:३० वाजता साईदामोधर मंगल कार्यालय ,आरमोरी येथे सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्व आरमोरीकरांनी सभेस उपस्थित राहावे असे आव्हान लोकहित संघर्ष समिती चे पदाधिकारी प्रफुल खापरे, अमोल मारकवार , मनोज वनमाळी, सुनील नंदनवार, माणिक भोयर, रणजीत बनकर ,निखिल धार्मिक , राहुल जुआरे , देवानंद दुमाणे ,संजय वाकडे ,राकेश सोनकुसरे, महेंद्र शेंडे , विनोद निमजे, रिंकु झरकर, अनंता भोयर, विक्की उंदिरवाडे , शालिक पत्रे ,अशोक वाकडे ,राजूजी अंबानी ,कल्पनाताई तिजारे ,अमीन लालानी ,प्रदीप हजारे, ज्योतीताई सोनकुसरे, ज्योतीताई घुटके, दीपक गोंदोळे,शुभांगीताई गराडे,छायाताई मानकर ,विभाताई बोबाटे ,सुरज पडोळे, महादेव कोपुलवार,नेपचन्द्र पेलणे, शाबीर शेख, यांनी केले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com