वणी : परशुराम पोटे
तालुक्यातील कुंभारखनी, घोंसा डब्लुसीएल ची ओबी विना परवाना वणीत येत असुन या ओबी चा वापर विविध कामांसह मकानांच्या भर भरण्यासाठी होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे मध्यरात्री हा खेळ सुरू असुन रात्रीच या ओबी ची विल्लेवाट लावल्या जात आहे. मात्र महसुल विभागाचे दुर्लक्ष का होत आहे! हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ओव्हरबर्डन (ओबी) ही ओपन कास्ट मायनिंग दरम्यान उत्खनन केलेली माती आहे. कोळसा उत्खननानंतर बॅकफिलिंग सामग्रीसाठी ओबीचा वापर केला जातो. ओबीचे उत्खनन केल्यानंतर, ओबीचे प्रमाण 20 टक्क्यांनी वाढते आणि हे अतिरिक्त प्रमाण वाळू वेगळे करण्यासाठी वापरले जाते. रेती हे गौण खनिज असल्याने राज्य सरकारच्या अखत्यारीत येते. शासनाची परवानगी १० जुलै पर्यंत असून फक्त दिवसा वाहतूक करणे आवश्यक आहे. परंतु रेतीच्या नावाने माती विक्रीचा गोरखधंदा सुरू असुन तोही मध्यरात्री सुरू आहे. आयव्हा ट्रकची वाहतूक मध्यरात्री सुरू होत असल्याने गणेशपुर ते दरवरे चौक मार्गावरील नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
डब्ल्यूसीएलच्या विधानानुसार, त्याने कोळसा खाणपलीकडे विविधीकरण केले आहे आणि त्याच्या ओव्हरबर्डन डंपपासून वेगळे वाळूची व्यावसायिक विक्री सुरू केली आहे. परंतु कोणताही परवाना नसतांना सर्रास ओबी वणी शहरात येत आहे. विशेष म्हणजे मध्यरात्री हा खेळ सुरू होत असून पहाटे पर्यंत चालत आहे. शहरातील मध्यभागी असलेल्या गांधी चौकातील एका कपडा व्यवसायिकाचे नव्याने सुरू असलेल्या मकानाच्या बांधकामात भर भरण्यात येत असुन ओबी खाली केल्यानंतर जेसीबी च्या सहाय्याने तात्काळ विल्लेवाट लावल्या जात आहे. अशा प्रकारे शहरात मोठ्या प्रमाणात ओबी विना परवाना येत असुन गणेशपुर परीसरात ओबी साठवणूक करण्यासाठी एक डेपो सुरू करण्यात आल्याची खबर मिळाली आहे. मात्र महसुल विभागाचे दुर्लक्ष का होत आहे हे एक कोडेच आहे.