नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली : येथील तलाव क्र १० प्रभागात आज ८ जुलैच्या पहाटे तलावात नागरीकांना ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह तरंगतांना दिसला. याची सुचना साकोली मिडीयाने पोलीस ठाणे येथे दिली.पोलीसांनी जलतरणपटूंच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. सदर इसम गुलाब धर्मा नागपूरे ४४ रा. तलाव वार्ड साकोली असे असून पोलीसांनी मर्ग दाखल करीत घटनेचा पंचनामा केला.
०८ पहाटे नागरीकांना तलावजवळ विश्वकर्मा मंदीर समोर मृतदेह दिसला लगेच ही माहिती साकोली मिडीयाने पोलीस ठाणे येथे हजर पीएसआय डि. ओ. सेलोकर यांना फोनने दिली तात्काळ पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सेलोकर, पोलीस नायक युवराज वरकडे यांनी सदर मृतदेह जलतरणपटू यांच्या मदतीने बाहेर काढला. हा व्यक्ती गुलाब धर्मा नागपूरे ४४ तलाव वार्ड साकोली असून तीन दिवसापूर्वी हे घरघूती वादातून बेपत्ता होते. आज मृतदेह काढताच त्यांच्या परीवारांनी उपजिल्हा रूग्णालयात जात ओळख पटविली. मागील २० दिवसापूर्वी याच तलावात कुंजीलाल बागडकर यांचे सद्धा मृतदेह येथे आढळले होते. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक डि.ओ. सेलोकर व पोलीस नायक युवराज वरकडे करीत आहे.