दख़ल न्यूज़ भारत:शंकर महाकाली

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

 

बल्लारपुर:महाराष्ट्र राज्याच्या दिव्यांग कृती आराखडा-2001 नुसार बल्लारपूर नगर परिषदेच्या सन 2021-22 या वार्षिक वित्तीय योजने अंतर्गत एकूण निधीपैकी पाच टक्के निधी दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कल्याण करिता आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठ पुराव्याने वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते व बल्लारपूर नगर परिषदेचे माजी अध्यक्ष हरीश शर्मा तसेच मुख्याधिकारी देवळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांग बांधवांना धनादेश वाटप करण्यात आले.याप्रसंगी मान्यवरांनी दिव्यांग बांधवांना संबोधित करताना या निधीचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यास वापर करावा असे सांगण्यात आले.या प्रसंगी न.प.बल्लारपुरचे उप मुख्याधिकारी कातकर साहेब,माजी स्वच्छता सभापती येलय्या दासरफ हे उपस्थित होते.न.प.कार्यालय अधीक्षक सौ.संगीता उमरे यांनी कार्यक्रमाचे संचालण केले. यावेळी दिव्यांग बांधवांनी मान्यवरांचे आभार मानले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com