दख़ल न्यूज़ भारत
शंकर महाकाली
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर
बल्लारपुर:माजी अर्थ नियोजन व वनमंत्री (म.रा.)आ.सुधीर मुनगंटीवार यांनी तालुका स्तरावर क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासणा करण्यांसाठी पोषक वातावरण तयार व्हावे करीता बल्लारपुर येथे अथक प्रयत्नाने क्रिडा संकुल उभारले. या क्रिडा संकुलाचे रितसर उदघाटन सुध्दा झाले असतांनाही वैष्वीक स्तरावर थैमान घातलेल्या कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षापासून क्रिडा संकुलातील जलतरण तलाव बंद होते.आजच्या घडीला कोरोणाची साथ मंदावली असल्याने नगर परिषदेचे माजी अध्यक्ष हरिश शर्मा यांच्या शुभहस्ते या तालुका क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे विधिवत शुभारंभ करून जलतरण पट्टुं करिता खुले करण्यात आले.यावेळी बल्लारपूरचे तहसीलदार संजय रांईचवार,किशोर पंदीलवार ,सुनिलसिंग बैस, सदानंद बुध्दार्थी इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.