सावली (सुधाकर दुधे)
दिनांक 7 जुलै 2022 रोजी
सकाळ दरम्यान गडचिरोली ते मुल मार्गावरून सावली पो . स्टे हद्यीतून अवैध गोवंश जनावरे वाहतुक होणार आहे अशी गोपनीय माहीती प्राप्त होती . त्यावरून चकपिरंजी ते सावली दरम्यान अचानक नाकाबंदी केली असता सकाळी अंदाजे ०७:३० च्या सुमारास मिळालेल्या गुप्त खबरेनुसार गडचिरोली दिशेकडून एका संशयीत ट्रकला थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये लहानमोठे एकूण ३० गोवंश जनावरे वाहनाची क्षमता नसतांना अत्यंत निर्दयतेने कुरपणे तोंडाला मोरके व दोराने पाय बांधून कोंबुन बसवून ठेवलेले दिसून आले . दोन्ही ट्रकमधील मिळून ३० गोवंश जनावरे कीमत अं ३,००,००० रू , अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क MH 29 AN 5786 कीमत २०,००,००० रू , एक मोबाईल की अं १०,००० रू असा एकूण २३,१०,००० रू चा माल जप्त करण्यात आला . सदरचे जप्त जनावरे ही त्यांच्या सुरक्षीतता व आरोग्याच्या दृष्टीने गोशाळेत दाखल करण्यात आले . 1001 1001 प्राथमीक स्वरूपात मिळून आलेल्या ट्रकचा चालक आरोपी शेख इरफान शेख मलंग वय २५ वर्ष रा . केरामेरी जि.आसीफाबाद तेलंगणा राज्य याचेविरूद्ध महाराष्ट्र पशू संवर्धन कायदा कलम ५ ( अ ) . ( ब ) , प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११ डी , एफ , महाराष्ट पोलीस अधिनियम कलम ११ ९ , मोटरवाहन अधिनियम कलम ८३/१७७ अन्वये गुन्हा नोंद दि .०७ / ०७ / २२ पो.स्टे सावली करण्यात आला . सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री अरविंद साळवे साहेब , मा . प्रभारी अपर पोलीस अधिक्षक श्री शेखर देशमुख साहेब , मा . उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मल्लीकार्जुन इंगळे साहेब , ठाणेदार श्री आशिष बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली पो . हवालदार दर्शन लाटकर , दिलीप मोहुर्ले , पो.का धिरज पिदुरकर , दिपक चव्हाण यांनी केली .