भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा- चिंचोली (ब्राम्हणवाडा थडी) येथे दहा दिवसीय धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न…

 

कैलास गजबे- करजगाव

           भारतीय बौध्द महासभा चांदुर बाजार कार्यकारिणी द्वारे आयोजित दहा दिवसीय धम्म उपासीका प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहात साजरा करण्यात आला. या शिबिराकरिता दहा दिवस मार्गदर्शन करण्याकरिता केंद्रीय शिक्षिका सरस्वतीताई साबळे (बुलडाणा) या होत्या.     

             डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारा आदर्श समाज निर्माण करण्याकरिता विविध प्रकारच्या विषयांवर मार्गदर्शन केले ज्या मध्ये बुवाबाजी, अंधश्रध्दा, धम्म अधम्म सद्दधम्म, बौद्धांचे सण उत्सव, पवित्र स्थळे,राजे महाराजे ,बाबासाहेबांनी देशासाठी केलेले कार्य,माता रमाई यांचा त्याग ,भारतीय बौद्ध महासभेची कार्यपद्धती अशा विविध विषयावर महिला उपासीकांना महिती देण्यात आली.शिबिराला महिला उपासीकांनी चांगली उपस्थिती दर्शविली.

     चिंचिली गावात शांतता रैली,महिला उपासिकांची मनोगते व नंतर वणी , बेलखेडा ,सोनोरी, सुरळी,माधान अलिपूर,ब्राम्हणवाडा पाठक या सात गावांचा सामूहिक समारोप ब्राम्हणवाडा पाठक येथे उत्साहात संपन्न झाला

            अशाच प्रकारे भारतीय बौद्ध महासभेचे इतर २४ प्रकारचे शिबिर राबविणेची गरज व इच्छा व्यक्त केली

              या शिबिरा करिता विशेष प्रयत्न अनिल वानखडे ,रोशन सोनोने,भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष पवन मनोहरे, अमरदिप गवई उपाध्यक्ष(समता सैनिक दल ), योगेश तानोलकर ( तालुका सरचिटणीस) अरुण तेलमोरे (कोषाध्यक्ष) राजकुमार खंडारे (तालुका उपाध्यक्ष, संस्कार विभाग ), श्रीधर वानखडे (शहर सचिव), बुद्धभूषण तागडे ( शहराध्यक्ष),स्वप्निल वानखडे ( तालुका सचिव ) तालुका तसेच ग्रामपदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.