एम.आय.टी. काॅलेजला सा.फु. पुणे विद्यापीठाकडून गणितचे संशोधन केंद्र सरू करण्यास मान्यता.

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

आळंदी : येथील एम.आय.टी. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आळंदी (डी), पुणे येथे गणित विषयाचे संशोधन केंद्र सरू करण्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा कडून मान्यता देण्यात आली, महाविद्यालय एम.एस.सी (इंडस्ट्रियल म्यॅथ्यमॅटिकस कम्प्युटर अँप्लिकेशन) सह संगणकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, वाणिज्य व जनसंवाद पत्रकारिता, या स्वरूपाचे अनेक पदवी व पदव्युत्तर आभासक्रम शिकविले जातता. या संशोधन केंद्र मुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गणिताच्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. 

          गणितीय ज्ञानाच्या प्रगतीला आणि वास्तविक जगाच्या समस्यांसाठी नाविन्यपूर्ण उपायांना प्रोत्साहन देने, संशोधकांना जटिल गणिती समस्यांचा सखोल अभ्यास करण्यास आणि विविध क्षेत्रांमध्ये व्यावहारिक अनुप्रयोग असलेले नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यास सक्षम करने व समाज आणि देशाच्या प्रगती मध्ये योगदान देणे हा संशोधन केंद्रचा प्रमुख उदेश असेल असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.बी.वाफारे यांनी व्यक्त केले. 

         महाविद्यालयात सुसज्ज ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा आणि अत्याधुनिक सॉफ्टवेअर उपलब्धा आहे. या संशोधन केंद्राची स्थापना हे महाविद्यालयसाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे असे मत गणित विभागाचे प्रमुख डॉ.प्रदीप पानसरे यांनी व्यक्ता केले.