पिपळा शिवार येथे रेतीसह टॅक्टर जप्त..  — ६ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात.. — दोघांविरुद्ध पारशिवनी पोलिसानी केला गुन्हा दाखल..

कमलसिंह यादव 

   प्रतिनिधी

पारशिवनी  : पारशिवनी तालुक्यातिल दक्षिणेस दहा कि. मीं.अंतरावर असलेल्या मौजा पिपळा शेत शिवार येथे  पारशिवनी पोलिसांच्या कार्यवाही दरम्यान टॅक्टरट्रॉलीत रेती आढळून आल्याने पोलिस पथका चे पोलिस उपनिरिक्षक मुढें व पोलिस रूपेश राठौड यांनी टॅक्टर चालक विनोद भिमराव भुते यांचे टॅक्टर जप्त करून संबंधित कागदपत्रांची मागणी केली.

       कारवाई मध्ये विनारॉयल्टीची रेती चोरी करून वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. यात चालक विनोद भिमराव भुते वय २९ वर्ष राहणार पालोरा व मालक इरफान हबिक खान पठाण वय ३२ वर्ष राहणार पालोरा,तालुका पारशिवनी या दोघांच्या विरुद्ध तक्रारदार पोलिस रूपेश तुकाराम राठौड यांच्या तक्रारी वरून पोलिसानी अपराध क्रमाक १४४/२३ अन्वये कलम ३७९,(३४) भादवी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून एकूण ६ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

      ट्रॅक्टर चालक विनोद भीमराव भुते (२९) व मालक इरफान हबीब खान पठाण (३२), दोघेही .रा. पालोरा, ता. पारशिवनी, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

      पारशिवनी पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना पिपळा शिवारातून एम.एच.४०,बी.जी. २१६३ क्रमांकाचा ट्रॅक्टर येताना दिसला. संशय आल्याने त्यांना हा ट्रॅक्टर अडवून त्याला जोडलेल्या एम.एच. ४०, एल. ८९३१ क्रमांकच्या ट्रालीची झडती घेतली. त्या टाली मध्ये एक ब्रास चोरीची रेती वाहतुक करताना आढळुन येताच पोलिसानी चालक विजय भुते याला कागज ची मागणी केली.

     चौकशी दरम्यान त्या रेतीची विनारॉयल्टी वाहतूक असल्याचे स्पष्ट झाले.शिवाय ती रेती ईरफान हबीब खान पठाण यांच्या सांगण्यावरून वाहून नेली जात असल्याचे चालक  विनोदने पोलिसांना सांगितले. 

       त्यामुळे पोलिसांनी त्या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांच्याकडून ६ लाख ५० हजार रुपयांचा ट्रॅक्टरट्रालीसह एक ब्रास रेती असा एकूण ६ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून,पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मुंढे,पोलिस सिपाई रुपेश राठौड पुढील तपास करीत आहे.