नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -सम्राट महिला प्रभाग संघाची द्वितीय वार्षिक सर्वसाधारण सभा व वार्षिक अधिवेशन स्नेहसंमेलन इंद्रपुरी टोली सभा मंडप उमरी येथे आयोजित केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष भूमिता राजेश धकाते कार्यक्रमाचे उद्घाटक शितल राऊत जि.प.सदस्य, प्रमुख अतिथी अनिल किरणापुरे पं.स.सदस्य , शुभांगी ताई मेंढे,इंद्रायणी कापगते,भोजराज कापगते, पूजाताई देशमुख, गजानन कापगते, यशवंत कापगते,प्रल्हाद शेदंरे, देवेंद्र खुजे, कमलेशानंद फरकुंडे,सोनल पाझारे, पूनम सांदेकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी ,जिजाऊ ग्रामसंघ लवारी, उमेद ग्रामसंघ लवारी, नवजीवन ग्राम संघ उमरी, आशीर्वाद ग्रामसंघ उमरी, संजीवनी ग्रामसंघ परसोडी, समृद्धी ग्रामसंघ परसोडी ,किरण ग्रामसंघ चारगांव , कर्तव्य ग्रामसंघ सुंदरी, दीपज्योती ग्रामसंघ विर्शी,मुस्कान ग्रामसंघ पाथरी ,संघम ग्रामसंघ जमणापूर,शिल ग्रामसंघ खैरलांजी, क्रांतीसुर्य ग्रामसंघ विर्शी, व समस्त महिला बालगोपाल उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी अनिल किरणापुरे म्हणाले की उमेद अभियान मुळे महिलांना रोजगाराची संधी व महिलांचे सुप्त गुण,कला कौशल्य प्रकट करण्याचे प्लॅटफॉर्म झाले आहे. बचत गटाच्या माध्यमातून प्रोडक्ट तयार करण्याआधी मार्केटिंग कशी करावी याचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे, उद्योग तयार करताना कोणत्या मालाची जास्त डिमांड आहे असे कृषी उद्योग महिलांनी तयार करावे .उमेद अभियानच महिला सक्षमीकरणाचा पाया ठरेल असे दिसून येते घरात काम करताना समाजात काम करताना घराकडे मुलांकडे लक्ष देणे तेवढेच गरजेचे आहे आपलं मुलं सुसंस्कारित कसे होतील हे सुद्धा बघणे तेवढेच महत्त्वाचे आहे सर्व महिलांनी विविध क्षेत्रात स्पर्धेत उतरूण संधीच सोनं केलं पाहिजे असे ते बोलत होते.
कार्यक्रमांमध्ये विविध प्रॉडक्ट चे स्टाल लावण्यात आले होते सांस्कृतिक कार्यक्रम ,एक पात्री नाटक, डान्स अनेक मार्गदर्शन कार्यक्रम झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनल पाझारे, प्रास्ताविक कमलेशानंद फरकुंडे त्यांनी केले.