छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेप टिपणी करणारा पोलिसांच्या कैदीत… – चिमूर शहरातील शिवभक्त आक्रमक…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

       चिमूर शहरातील नेताजी वॉर्ड येथील सोनू शेख या तरुणाने इंस्टाग्राम वर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान पोस्ट केल्याने चिमूर शहरात तणावाचे वातावरण तयार झाले होते. चिमूर पोलिसांनी ताबडतोब आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करीत लॉकअप मध्ये बंद केल्याने वातावरण शांत झाले.

            सविस्तर वृत्त असे की दिनांक ७ मार्च २०२५ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास चिमूर शहरातील नेताजी वार्डातील सोनू शेख या युवकाने इंस्टाग्राम अकाउंट वरून एका युवकाच्या पोस्ट वर छत्रपती संभाजी महाराज यांच्या व्हिडिओ पोस्ट वर आक्षेपार्थ विधान केल्याने चिमूर शहरात वातावरण तापले.

              शहरातील हजारो युवकांनी एकत्र येत पोलिस स्टेशन चिमूर येथे घेराव घातला. पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांनी तातडीने सूत्र हलवित सहायक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे यांनी सापळा रचत पोलिस स्टॉपच्या मदतीने काही वेळातच आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करीत आरोपी सोनू शेखला पोलिस हिरासत मध्ये घेतले.  परिस्थिती नियंत्रणात आणली.

           दरम्यान सकल हिंदू संघटनेच्या वतीने दिनांक ९ मार्चला चिमूर बंदचे आव्हान करण्यात आले.