
भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा यांच्या वतीने जल संवर्धनकरिता युवशक्तीचे लेखा येथे दिनांक सहा मार्च रोजी राष्ट्रीय सेवा योजना शिबीर आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उदघाटक सौ.नंदाताई दुगा सरपंच लेखा यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उदय थुल सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद लेनगुरे माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली पोलीस पाटील सुरेश उसेंडी लेखा नामदेव तोफा जगदीश राऊत रसेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.संजय मुरकुटे सह कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रशांत वाळके प्रा.डॉ.गणेश चुदरी हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संजय मुरकुटे यांनी कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली.
यावेळी विनोद लेनगुरे यांनी आपल्या भाषणात येणाऱ्या काळात पाण्याची भीषण समस्या जाणवणार आहे मी आणि आपण पाणी जो वापरत आहोत त्या पाण्याचा कसा वापर करायला पाहिजे. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला अभ्यास करण्याची तेवढीच गरज पडणार आहे असे सांगितले. नामदेव तोफा जगदीश राऊत यांचेही भाषण झालीत कार्यक्रमाचे उदघाटक नंदा दुगा सरपंच यांनी युवाशक्ती आणि कायद्याचा विचार करता आज वनहक्क कायदा जरी असला तरी प्रत्येकाला तो कायदा माहित नाही त्या वन हक्क कायद्याविषयी माहिती करून घेतली पाहिजे. जिल्ह्यात शिक्षणाची सोय श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था यांनी एक खूप चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे असे गौरव उद्गार याप्रसंगी त्यांनी काढले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर उदय थुल यांनी जल संवर्धन कसे करता येईल हे स्वयंसेकानी गावातील नागरिकाला पटवून देण्यात यशस्वी होतील असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक नितेश पुण्यप्रेड्डीवार यांनी केले आभार प्रा प्रशांत वाळके यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी आणि स्वयंसेवक उपस्थित होते.