
सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात आपल्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेली कोट्यावधींची विकास कामे अजूनही प्रलंबित आहेत. तत्पूर्वी तालुक्यातील सिंचन व्यवस्था, तलाव दुरुस्ती, शेतकऱ्यांकरिता पादन रस्ते व सर्व सामान्या संबंधित इतर विकास कामे पावसाळा हंगामापूर्वी तातडीने पूर्ण करा असे निर्देश राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी दिले ते सावली पंचायत समिती येथे आयोजित आढावा सभेत बोलत होते.
आयोजित आढावा सभेस उपजिल्हाधिकारी पुनर्वसन अतुल जटाले, उपविभागीय अधिकारी अजय तरडे, सावली तहसीलदार प्रांजली चीरडे, माजी जी.प.सभापती दिनेश चीटनुरवार, गटविकास अधिकारी योगेश गाडे, तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहणे, माजी जी.प.सभापती यशवंत तडाम, माजी प.सं सभापती विजय कोरेवार, सावली ठाणेदार पूलरवार, पाथरी ठाणेदार प्रमोद रासकर, सावली नगराध्यक्ष लता लाकडे, कृष्णा राऊत, उपस्थित होते.
यावेळी विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी माजी जि.प.सदस्य यशवंत ताडाम यांनी उपस्थित केलेल्या गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त जमीन अधिग्रहन मोबदल्या प्रकरणी तसेच प्रकल्पग्रस्त दाखला मिळणे संदर्भात प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा करून प्रलंबित प्रश्नाबाबत तातडीने तोडगा काढण्याचे सांगितले.
सोबतच जि.प.सिंचाई जि.प. बांधकाम, जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना, घरकुल योजना, रोहयो योजना, पादन रस्ते, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह जीवन ग्राम उन्नती अभियान, लाडक्या बहिण योजनेचा विस्तृत आढावा घेतला.
यावेळी मनरेगा अंतर्गत अतिरिक्त कुशल मधील मंजूर 41 कामे पूर्ण न झाल्याने ते तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सोबतच येणारा हंगाम हा शेती हंगाम असून सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचन व्यवस्था करून देण्यासंदर्भात तसेच तलाव फुटून नुकसान टाळण्याकरिता तातडीने उपाययोजना करण्याचे सांगितले. यावेळी सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.