नंदलाल पाटील कापगते विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली :- नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.

      कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती रसिका बी कापगते यांनी दीप प्रज्वलनाने केली, याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापिका स्वाती गहाणे, डी.एस. बोरकर, के.एम.कापगते, एम.एम.कापगते व्यासपीठावर उपस्थित होते.

         याप्रसंगी शालेय विद्यार्थिनींनी कुमारी तनिया भुरे, अंजली धकाते ,अंजली राठोड,कुमारी गौतम व जतिन कापगते इत्यादी विद्यार्थ्यांनी महिला दिनाचे महत्त्व, महिलांच्या हक्काविषयी आणि त्यांच्या कर्तृत्व विषयी मुक्तपणे विचार ठेवून मनोगत व्यक्त केले.

         तसेच विद्यालयामध्ये महिला दिनाचे औचित्य साधून पोस्टर्स स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोली स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

         विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाल्या स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा यांची मूर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत कमी नाही. स्त्री अधिक संवेदनशील, श्रद्धावंत आहे तिला देवत्वाचे अस्तित्व अधिक जाणवते. स्त्रिया विविध क्षेत्रांमध्ये आपले कर्तुत्व गाजवत आहेत.पोलीस, लष्करी दल याबरोबरच रिक्षा, ट्रक चालवणे, पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करणे, बस कंडक्टर, पत्रकारिता, फायर ब्रिगेड ही क्षेत्रे सुद्धा महिलांनी काबीज केलेली आहेत असे मार्मिक विचार मुख्याध्यापिका रसिका कापगते यांनी व्यक्त केले. तसेच डी.एस.बोरकर, के.एम.कापगते यांनी सुद्धा महिला सक्षमीकरणावर आपले विचार व्यक्त केले. 

           कार्यक्रमाचे संचालन आर.व्ही.दिघोरे यांनी आभार प्रदर्शन सोनाली क-हाडे यांनी केले. 

            कार्यक्रमाचे यशस्वीते करिता प्रा.के.जी. लोथे, प्रा. नागोसे, प्रा. सुमन पस्तोडे, प्राध्यापिका रविता बोरकर, प्राध्यापिका भावना गहाणे, प्राध्यापिका भूमिका नाकाडे,मीना शिवणकर, वेणू निखारे, बबली लांजेवार इत्यादी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.