
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
पुणे, दिनांक ८ मार्च २०२५
राज्यात देवेंद्र फडणवीस सत्तेवर आल्यानंतर सर्वकर्षी विकासाची अपेक्षा आहे. राज्याच्या विकासाचे संकेत देखील मिळत आहेत.फडणवीसांच्या नेतृत्वात त्यामुळे राज्याची आर्थिक गाडी रूळावर येईल, असा विश्वास इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केला. विशेष म्हणजे देशाचा विकास दर ६.५% अपेक्षित असतांना राज्याचा विकास दर ७.३% राहण्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आल्याने सकारात्मक वातावरण असल्याचे पाटील म्हणाले.
महाविकास आघाडी काळात खोळंबलेली विकासकार्य वेगाने पुर्ण करण्याकडे सरकारचा कल आहे.कृषी क्षेत्रासह उद्योग आणि सेवा क्षेत्रात त्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. गतवर्षी २०२३-२४ मध्ये देखील राज्याचा विकासदर ७.६% होता. पंरतू, राजकीय स्थिरतेमुळे यंदा यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पाटील म्हणाले.
राज्याचे दरडोई उत्पन्न वाढीची शक्यता आहे.गतवर्षी महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न २ लाख ७८ हजार कोटी होते. यंदा ते ३ लाख ९ हजार कोटींवर जाईल, असा अंदाज बांधण्यात आला आहे.राज्यावरील कर्जाचे डोंगर कमी करण्याचे आव्हान सरकार समोर राहील. ८ लाख कोटींचे कर्ज सरकारवर होण्याची शक्यता आहे. अशात फडणवीस सरकारने हे कर्ज कमी करण्याच्या अनुषंगाने योग्य उपाययोजना आखण्याव्यात,असे आवाहन पाटील यांनी केले.
गतवर्षी व्याजापोटी ४८ हजार कोटीं खर्च झाले.कर्जाची रक्कम फेडतांना विकास कामे, लोकोपयोगी योजनांच्या आर्थिक तरतुदीत कपात न करण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.
अस्मानी संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी फडणवीस सरकार सदैव सकारात्मक असते. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी १४७० कोटी सरकारने मंजूर केल्याचा दावा पाटील यांनी आर्थिक सर्वेक्षणाच्या आधारे केला आहे. औद्योगिक क्षेत्रात चांगले काम करण्याचे तसेच गुंतवणूक आकर्षिक करीत रोजगार निर्मितीवर सरकारने अधिक लक्ष केंद्रित केल्यास विकासाचा वेग वाढेल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.