महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समन्वय समिती तालुका चिमुर तर्फे महामहीम राष्ट्रपती सह भारत देशाच्या प्रधानमंत्र्यांना चिमूर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे द्वारे निवेदन… — बिहार राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनाही निवेदन…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

        बुध्दगया येथील महाबोधी महाविहार १९४९ चा व्यवस्थापन अॅक्ट रद्द करुन महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौध्दांच्या हाती देण्यात यावे यासाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समन्वय समिती तालुका चिमूर पदाधिकाऱ्यांचा तर्फे महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, बिहार राज्याचे महामहीम राज्यपाल नजीब जंग,मुख्यमंत्री नितीशकुमार यांना चिमूरचे उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांच्या द्वारे निवेदन देण्यात आले.

        निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,बिहार राज्यातील स्थित बुध्दगया येथील महाबोधी महाविहार हे बौध्दांचे ऐतिहासिक स्थळ आहे.जगभरातील बौध्द व देशातील सर्व बौध्द बांधवांच्या भावना महाबोधी महाविहार स्थळाशी जुळलेल्या आहेत,बौध्दांच्या या ऐतिहासिक महाविहारा मध्ये बुध्दांच्या मुर्तीचे विद्रुपीकरण करुन ते हिंदू धर्मियांचे देव असल्याचे पर्यटकांना भासविले जात आहे.

         यामुळे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समन्वय समिती तालुका चिमुर,जि.चंद्रपूर (म.रा.) व्दारे ७ मार्च २०२५ ला देशाच्या राष्ट्रपती,देशाचे प्रधानमंत्री,बिहार राज्याचे राज्यपाल नजीब जंग,राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत.

    १) बुध्दगया येथील,महाबोधी महाविहार १९४९ च्या व्यवस्थापन अॅक्ट तात्काळ रद्द करुन महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौध्दांच्या हाती देण्यात यावे.

      २) बुध्दगया महाबोधी महाविहार येथे सुरु असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरीत मंजूर करण्यात याव्यात.

           चिमूर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांना निवेदन देताना समितीचे अध्यक्ष आयु.विलास राऊत, सचिव शुभम मडपे,कोषाध्यक्ष प्रशांतकुमार देठे,राजू अलोने,उत्तम रामटेके,प्रियानंद गेडाम,गोपी घुटके,झामानंद धनविजय,मनोज राऊत,किशोर घोनमोडे,शालीक थुल,राजू घोनमोडे,रंजीत पाटिल,गुलाब गणविर,निलेश्वर कोसे,विलास राऊत,दिलीप दिठे,शुभम मंडपे,नारायण कांबळे,प्रशांत देळे,रामचंद्र गेडाम,शिवराम मेश्राम,रामराव नन्नावरे,आदींची उपस्थित होते.