
भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
आज दिनांक 8/3/2025 रोजी पोलीस मदत केंद्र चातगाव व ग्रामपंचायत चातगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला ग्रामसभा चातगाव येथे महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिन आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती लता माधव उईके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस मदत केंद्र चातगाव व ग्रामपंचायत चातगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला ग्रामसभा घेण्यात आली.
यावेळी चातगाव पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक अक्षय जाधव ग्रामपंचायत चातगावचे ग्रामपंचायत अधिकारी रणजीत राठोड हे मंचावर उपस्थित होते. महिला दिनानिमित्त महिलांचा पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच ग्रामपंचायत तर्फे ग्रामसंघाचे अध्यक्ष व सचिव यांचाहि सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अक्षय जाधव यांनी महिलांनी केलेल्या कार्याचा गौरव करताना महिला सक्षम होत आहे विविध क्षेत्रात महिला आपले कर्तुत्व गाजवताना दिसत आहे.महिलांनी पुरुषांवर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहावे असे मत व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी रंजीत राठोड यांनीही महिलांविषयी गौरोजगार काढताना त्यांनी महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे यावे असे उपस्थित महिलांना संबोधित करत होते. या कार्यक्रमाला चातगाव पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी ग्रामपंचायतची कर्मचारी व गावातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.