भारतीय स्त्री : आजची, उद्याची….

भारतीय स्त्री : आजची, उद्याची…

      राष्ट्रीय स्वातंत्र्या आधी मुगल असो की इंग्रज साम्राज्यात धर्माचा पगडा अधिष्ठान,श्रध्दा,कायदा,संस्कृती आणि सत्तेने धर्मात हस्तक्षेप करू नये,या कडकं नियमामुळे स्त्री स्वातंत्र्याचे आकुंचन झाले.

        पुरुषसत्ताक पद्धत मजबूत झाली.धर्माचा पगडा बसला. वंशत्वाचे बंधन पडले.गुलामी हीच नीतिमत्ता नैतिकता जोपासल्या गेली.परिणामी सतीची चाल,चुळमुल,कुटुंबीयांची व समाजाची सेवा,वैधव्य,केशवपन,आणि स्त्रीचा जन्म केवळ पुरुषाची दासी,आणि पुरुष म्हणजे तिचा मालक,जनुकांही युद्ध करून जिंकून आणलेली,अशीच सरंजामी विचाराच्या दबावात स्त्री वावरत होती.

        शिक्षण घेणे,नोकरी धंदा करून संपती कमविणे,ती आपल्या नावे ठेवणे याची परवानगी नव्हती.बापाच्या संपत्तीत सुद्धा ती हक्कदार नव्हती.नवऱ्याच्या तर नाहीच. मूल दत्तक घेण्याचा अधिकार नव्हता,या सर्व परिस्थितीतून भारतीय स्वातंत्र्याने बाहेर काढले.

          हुकूमशाही गेली,लोकशाही आली,संविधानाने स्त्रीला मतदानाचा हक्क बहाल केला,आणि तिच्यासाठी राजकीय,सामाजिक,आर्थिक,धार्मिक,सांस्कृतिक या मानवी अंगांची सर्व दारे खुली झाली.

       ही किमया संविधानाने आणि हींदुकोडबिल आणून बाबासाहेबांनी मोठ्या शिताफीने केली.ही झाली कालची स्त्री.

        आजच्या स्त्रीचे जीवन कसे आहे ? सर्व कायदे स्त्रीच्या बाजूने असले तरी भांडवलशाही आणि सरंजामशाहीचे अवशेष नष्ट झाले नाहीत,अजूनही सत्तेवर जमीनदार व भांडवलदार आणि त्यांचे हस्तक पेद्दे च आहेत,म्हणून या कायद्याची अंमलबजावणी म्हणावी तशी परिणामकारक होत नाही.

        कारण आपली संपती वाढविणे,ती संरक्षित ठेवणे यासाठी त्यांना सत्तेत राहणे आवश्यक आहे.शिवाय ही भांडवलशाही म्हणजे नफा,पैसा कमावण्याची,साठविण्याची व्यवस्था कायम टिकून राहण्यासाठी धर्म रूढी परंपरा अंधश्रध्दा जोपासणे आवश्यक ठरते.पूरक ठरते.

       म्हणून अंधश्रद्धा जोपासण्याचे महत्त्वाचे काम हा स्त्रीवर्ग करत असतो,जो लोकसंख्येचा अर्धा भाग आहे.जो मतदानास मदतीचा ठरतो,सत्ता टिकवून ठेवण्यास उपयोगी ठरतो.

       म्हणून ही धर्मव्यावस्था,अंधश्रध्दा मजबूत करण्याचे काम जे करतात,ते म्हणजे बुवा बापू महाराज कीर्तनकार कथाकार यांचे कार्यक्रम हजारो लाखो रुपये खर्च करून घडऊंन आणतात.”

       आचार्य अत्रे यांच्या नाटक ” बुवा तेथे बाया ” हे रोज राजरोसपणे आजही वर्तमानात मोठ्या प्रमाणात चालले आहे.कुटुंबाची सेवा,समाजाची सेवा हा तिचा धर्म आणि निती,पुरुष सत्ता क पद्धत मजबूत आहे.आजच्या स्त्रीची आवस्था तर पूर्वीच्या पेक्षाही वाईट आहे.

        कारण पूर्वी फक्त घरातीलच कामे करावी लागायची.परंतु आता तिला बाहेर दहातास नोकरी करून घरी चार तास काम करावेच लागते.

        चूल,मूल मध्ये आता नोकरी सांभाळण्याचे पण काम लागले.कारण स्त्रिकड पाहण्याचा दृष्टीकोन म्हणजे ती एक निर्जीव वस्तू प्रमाणे एक वापरायचे, उपभोगचे साधन असून बैल किंवा यंत्रा सारखे उत्पन्न पैसे मिळविण्याचे साधन म्हणून पाहन्याचा पुरुषांचा,समाजाचा दृष्टीकोन बनला आहे.

        म्हणून आजची स्त्री चूल मूल नवरा सासू सासरे सर्व कुटुंबाची सेवा आणि त्यांचेसाठी कमावणे पण.अशी अवस्था आहे.

       कारण सुशिक्षित बेकारी मुळे पुरुषास काम मिळाले नाही तर स्त्रीने ते करावे.किंवा कुटुंबाचा खर्च मुलांचे शिक्षण,सर्वांचे आरोग्य,घरभाडे,प्रवास हा खर्च भागात नाही म्हणून स्त्री पुरुष दोघांनी पण काम केले पाहिजे,ही परिस्थिती आहे.

        म्हणून आजची स्त्री पैसे कमावून पण तिला सुख शांती समाधान आनंद नाही.

       या परिस्थितीत बदल झाला नाही,स्त्री म्हणजे केवळ पैसे मीलाऊन देण्याचे साधन,उपभोगाची वस्तू म्हणून पाहत राहिले,तर उद्याच्या स्त्रीचे भवितव्य अंधारातच आहे.

        तिला स्वातंत्र्य कधीच मिळाले नाही,अजूनही मिळणार नाही.या कुटुंब व्यवस्थेत पुरुष सत्ता पद्धतीत,पुरुषाच्या जोखडात ती बैलाप्रमाने यांत्राप्रमाने गुलाम सारखे राबताच राहील.

       यावर उपाय एकच : स्त्री संघटना आणि संघर्ष…

        लेखक :  दत्ता तुमवाड

           सत्यशोधक समाज नांदेड.

    दिनांक : 8 मार्च 2025 महिला मुक्तिदिन.

                     फोन: 9420912209.