
अश्विन बोदेले
जिल्हा प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
आरमोरी : आरमोरी तालुका स्थळापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विहीरगाव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य सौ. रेशमाताई गेडेकर , सौ. दुर्गाताई भोयर यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
आज ८ मार्च, जागतिक महिला दिन ! हा दिवस महिलांच्या संघर्षाचा, त्यागाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. आपल्या समाजात महिला फक्त घराच्या चौकटीत मर्यादित न राहता शिक्षण, विज्ञान, क्रीडा, व्यवसाय, प्रशासन अशा विविध क्षेत्रांत यशस्वीपणे आपली छाप उमटवत आहेत.
यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या कर्तुत्वावर महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली.
आपण सर्वजण महिलांच्या सशक्तीकरणासाठी पुढाकार घेऊ, त्यांच्या अधिकारांसाठी आवाज उठवू आणि एक समान व न्याय्य समाज घडवू. महिलांचा आदर करणे ही केवळ जबाबदारी नाही, तर ती एक संस्कृती असली पाहिजे. अशाप्रकारे शाळेतील सहाय्यक शिक्षक श्री. अभय खोब्रागडे सर यांनी आपले प्रास्ताविकातून सांगितले.
तर प्रमुख आणि मुख्य मार्गदर्शक म्हणून शाळेतील मुख्याध्यापक श्री.विनोद खोब्रागडे सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की,पूर्वी महिलांना अनेक बंधनं होती.पण त्यांनी आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले.
सावित्रीबाई फुले, कल्पना चावला, किरण बेदी यांसारख्या महिलांमुळे आपल्याला प्रेरणा मिळते. पण केवळ काही महिलांचा सन्मान करून आपली जबाबदारी पूर्ण होत नाही. प्रत्येक स्त्रीला समान हक्क, संधी आणि आदर मिळायला हवा. अशाप्रकारे मौलिक मार्गदर्शन केले.
याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि महिला व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच शाळेतील सहाय्यक शिक्षक श्री.अभय खोब्रागडे सर,श्री.देशकर सर, श्री.बोदेले सर व शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन श्री.अश्विन बोदेले सर तर आभार श्री.देशकर सर यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले.