दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
पुणे:-
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन पुणे येथे १६ मार्चला होणार असून या अधिवेशनाचे अध्यक्षपद म.रा.प.संघाचे राज्याध्यक्ष वसंत मुंडे भुषविणार आहेत.तद्वतच सदर अधिवेशनाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनाच्या पुर्व संध्येला म्हणजेच १५ मार्चला सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र राज्यातंर्गत प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी-सदस्य,सर्व विभागीय अध्यक्ष व कार्यकारणी पदाधिकारी-सदस्य,सर्व जिल्हा अध्यक्ष व कार्यकारणी पदाधिकारी-सदस्य,यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून या बैठकीत वरील सर्व प्रकारच्या पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांनी पत्रकान्वये कळवीले आहे.
याचबरोबर १६ मार्चला होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाला महाराष्ट्र राज्यातील राज्य, विभागीय, जिल्हा, तालुका स्तरावरील सर्व प्रकारच्या पदाधिकाऱ्यांना व सदस्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अधिवेशनाचे उद्घाटन १६ मार्चला सकाळी होणार असून,दुपारी चर्चासत्र व मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे तर सायंकाळी अधिवेशनाचा समारोपीय कार्यक्रम होणार आहे.