कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
कन्हान : – शहरातील शहिद चौक साई काॅम्पलेक्स येथील माया सेल्स दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी ५९ हजार १५३ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याने कन्हान पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.६) मार्चला रात्री ९:३० वाजता दरम्यान चंद्रकांत प्रकाश चावला वय ४८ वर्ष रा. कामठी हे आपल्या दुकानाचे शटर बंद करुन दोन्ही साईडचे कुलुप लावुन घरी गेले.
गुरूवार (दि.७) मार्चला सकाळी ७ वाजता दरम्यान ग्राहक अश्विन रा.कन्हान याने दुकानदाराला फोन करुन सांगितले कि तुमच्या दुकानात रिकाम्या अंड्याचे ट्रे परत करायला आलो आहे आणि तुमच्या दुकानाचे शटर थोडेसे उघडे आहे.
माहिती होताच दुकानादाराने आपल्या दुकानात पोहोचून पाहणी केली असता दुकानाचे शेटर थोडासा उघडा दिसला.
मात्र,शेटर बंद करतांना लावलेले कुलुप तसेच असल्याचे आढळुन आले.दुकानदाराने आत मध्ये जाऊन पाहणी केली असता गल्यात ठेवलेले रोख २६,हजार रु. ज्यामध्ये १००, ५०, २०, १० रुपयांचे बंडल बनवले होते आणि चिल्कर पैसे १५००० रु. ज्यात १०, ५ रुपयांचे सिक्के होते व वेगवेगळ्या कंपनीच्या सिगरेट किंमत १८,१५३ रु. असा एकुण ५९,१५३ रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे लक्षात आले.
शटरचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी चंद्रकांत चावला यांचा तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध अप.क्र. १९९/२४ कलम ४५७,३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित असून आरोपीचा शोध घेत आहे.