युवराज डोंगरे
प्रतिनिधी
खल्लार(जि अमरावती)
रंगपंचमीच्या दिवशी खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील बेंबळा बु। गावालगत गोमांस विकणाऱ्यास खल्लार पोलिसांनी दि 7 मार्चला सकाळच्या सुमारास पकडले असून त्याच्याविरुध्द खल्लार ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत
खल्लार पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार काकडा ता अचलपूर येथील शेख इरफान शेख कासम (42) हा बेंबळा बु। गावालगत गोमांस विकत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार ठाणेदार चंद्रकला मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ किशोर घुगे, परेश श्रीराव, विजय निमकांडे, गोपाल सोळंके, विनोद ढगे यांनी बेंबळा बु। गावालगत गोमांस विक्री करीत असलेल्या ठिकाणी धाड टाकून गोवंश जातीच्या जनावरांचे 10 किलो गोमांस व इतर साहित्य असा एकुण 2150 रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष ताब्यात घेऊन जप्त केला व आरोपी शेख इरफान शेख कासीम विरुध्द प्राणी संरक्षण अधिनियम 1995 सुधारणा अधिनियम 2015 अंतर्गत अप न 69/23,कलम 5,5(बि),5(क),9,9(अ)नुसार गुन्हा दाखल केला