नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली : भारतीय आयुर्विमा महामंडळ साकोली शाखेत मागील दोन वर्षातील विमा क्षेत्रा मधील उभरता सितारा रोशन कापगते यांनी चालू आर्थिक वर्षात अतिशय उल्लेखनीय कामगिरी करीत आपले विमा क्षेत्रातील पहिले पॉलिसी शतक पूर्ण केले. जागतिक महिला दिवस निमित्त 8 मार्चला रोशन कापगते यांनी 7 पॉलिसी पुर्ण करुन विमा क्षेत्रातील आपले पहिले पॉलिसी शतक पूर्ण केले आहे. नविन अभिकर्त्यान मध्ये रोशन कापगते यांनी जे कार्य केले ते कौतुकास्पद आहे. रोशन कापगते यांनी विमा क्षेत्राला एक वेगळी दिशा दिली आहे. त्याचे कार्याची जेवढी प्रशंसा केली जाईल तेवढी कमीच आहे.
त्यांनी दोन वर्षाच्या कारकिर्दीत सानगडी येथील गजानन महाराज चौकात ग्रामीण भागातील लोकांना विमा सुरक्षा मिळावी व त्यांना विमाच्या कामाकरीता कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये तसेच लोकांनी लहान सहान कामाकरीता 15 किलोमीटर दूर साकोली शाखेत जावे लागू नये याकरिता स्वतःचे ऑफिस विमा सेवा केंद्र उधळले आहे. त्या ऑफिस मध्ये पॉलिसीधारकांना उत्कृष्ट विमा सेवा देण्याचे महत्त्वपुर्ण कार्य रोशन करीत आहे. सानगडी भागात एल आय सी विमा अभिकर्त्याचे एकमेव ऑफिस रोशन कापगते यांचे आहे त्यामुळे पॉलिसी धारकांना त्याचा फायदा होत आहे. रोशन ने विमाग्रामच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांना सुरक्षा प्रदान करण्याचे महत्त्व पुर्ण कार्य करीत आहे.
सामाजिक कार्यात देखील रोशन कापगते यांचा नेहमीच सहभाग राहतो. रोशन कापगते याला 2020 मध्ये युवारत्न पुरस्कार मिळाला असल्यामुळे त्याचा फायदा विमा क्षेत्रातील त्याच्या प्रगती करिता होत आहे असे प्रतिपादन रोशन कापगते यांनी केले आहे.. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय एल आय सी अधिकारी वर्गाला व खास करून ग्रुप लीडर पुजा कुरंजेकर यांना दिले आहे.