धानोरा / भाविक करमनकर
स्थानिक श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जी सी पाटील. मुंनघाटे महाविद्यालयं धानोरा येथे दिनांक 3 मार्च 2023 पासून सुरू झालेल्या युवा सांस्कृतिक महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक 5मार्च 2023 ला अरण्यदीप युवा सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने माजी विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदर माजी विद्यार्थी व पालक मेळाव्याचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंकज चव्हाण यांनी भूषविले माजी विद्यार्थी व पालक मेळाव्याचे संयोजक डॉ.एच डी लांजेवार तसेच डॉ.आर .पी किरमिरे ,डॉ पंढरी वाघ डॉ प्रियंका पठाडे मंचावर प्रमुख अतिथी म्हणून विराजमान होते पालक म्हणून श्री सितारामजी बडोदे श्रीमती मोटघरे मॅडम मॅडम उपस्थित होते तर माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये श्री येमजेलवार ,सर श्री प्रा वसंत आवारी ,श्री गुरुदेव सोनुले श्रीमती चिचघरे ,श्रीमती प्रियलता मडावी, श्री बुरांडे ,श्री रामचंद्र कुदैशी , श्रीमती विजया तुलावी , प्रा.प्रमोद सहारे,कुमारी संतोषी सूत्रपवार, मंचावर उपस्थित होते महाविद्यालयात शिकत असताना विविध अनुभव आले त्या अनुभवाचे कथन माजी विद्यार्थ्यांच्या द्वारे करण्यात आले जिद्द आणि मेहनतीच्या बळावर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृद्धांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने आपण विविध यशाची शिखर पादाक्रांत करू शकतो असे वक्तव्य माजी रामचंद्र कुदैशि यांनी केले.
महाविद्यालयीन शिक्षण घेऊन 20 ते 22 वर्षाचा कालावधी झाला तरी देखील गुरुजनांशी विद्यार्थी गुरुचे संबंध कायम आहेत त्यांचे विविध मार्गदर्शन आत्ताही लाभते असे वक्तव्य प्रा.आवारी यांनी केले तर शिक्षण केवळ रोजगारापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक सचेतना जागृत करून सामुदायिक कर्तव्य भावना मनात रुजली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने विद्यार्थी म्हणून उद्दिष्ट प्राप्त होऊ शकतात आणि आजच्या युवा वर्गाकडून सामाजिक व राष्ट्रहित घडून यावे व राष्ट्रीय एकात्मतेची भावना त्यांच्या अंतकरणात रुजावी अशा पद्धतीचे शिक्षण महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावे व तसे विद्यार्थी घडावेत असा आशावाद पालक म्हणून श्री सितारामजी बडोदे यांनी आपल्या वक्तव्यातून केला अरण्यदीप युवा सांस्कृतीक तीन दिवसीय महोत्सवामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते रांगोळी स्पर्धा, डिश डेकोरेशन ,वक्तृत्व स्पर्धा गीत गायन स्पर्धा, प्रश्नमंजुषा ,काव्यवाचन ,अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये एकल नृत्य ,सामूहिक नृत्य ,सांस्कृतिक फॅशन शो ,तसेच नाटिकांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बहुसंख्य प्रमाणात सहभाग घेतला सदर स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकास व विजेत्या चमू चे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले एकंदरीत या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवामध्ये विविध कलागुणांचा अविष्काराचे प्रकटीकरण महाविद्यालयामध्ये करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन रा से यो विभाग प्रमुख प्रा ज्ञानेश बनसोड यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ प्रियंका पठाडे यांनी मानले अरण्यदीप युवा सांस्कृतीक महोत्सव यशस्वीरिता पार पडण्या करिता प्रा भाविकदास करमनकर प्रा डॉ गणेश चुदरी, प्रा डॉ डी बी झाडे ,डॉ पी बी गोहणे ,डॉ संजय मुरकुटे, प्रा प्रशांत वाळके प्रा, डॉ धवनकर ,प्रा नितेश पुण्यप्रे द्दीवार ,प्रा प्रशांत वाळके, प्रा धाकडे, प्रा खोब्रागडे, प्रा वटक, प्रा संजय मांडवगडे ,श्री वसंत चूदरी ,श्रीमती सज्जन पवार मॅडम, श्रीमती चंदेल मॅडम श्री भाष्कर कायते ,श्री गणेश लांबट ,श्री हरीश चंद्र गोहणे,श्री घोरपडे ,श्री ननावरे ,श्री हर्षेजी, श्री भास्कर जी वाडनकर, श्री बालाजी राजगडे तथा समस्त महाविद्यालयाचे कर्मचारी वृंदांनी सहकार्य केले या तीन दिवसीय युवा सांस्कृतिक महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला.