दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
आज जगात जागतिक महिला दिन म्हणून साजरा होतो आहे.या दिनाची पार्श्वभूमी म्हणजे जागतिक पातळीवर महिलां कामगारांचे अनन्यसाधारण संघर्षमय कार्य होय.तद्वतच महिलांच्या अधिकार हक्का संबधीचा अस्मिता दर्शक इतिहास होय.
१९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या इतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा,असा ठराव क्लारा झेटकिन यांनी मांडला व तो पास झाला.तेव्हा पासून महिला दिन जागतिक पातळीवर साजरा होतो आहे.
महिलांच्या कार्याचे व शौर्याचे स्मरण सातत्याने व्हावे व महिलांना जागतिक पातळीवर समानतेचा दर्जा मिळावा हा हेतू सुद्धा या दिनाचा होता व आहे.याचबरोबर महिलांवर कुठल्याही प्रकारचा अत्याचार व अन्याय्य होवू नये म्हणून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासन-प्रशासनाने व समाजाने स्वीकारली पाहिजे याचा उजाळा करणे हे महिला दिनाचे उद्दिष्ट आहे.
ज्या आयाबहिनी पिढ्यानपिढ्या दरपिढ्या आपणास सुरक्षित राहण्यासाठी धडपडतात,सुशिक्षित व समजदार बनवण्यासाठी काबाडकष्ट करतात,किंबहुना उपवासी राहुन तुम्हा आम्हाला जगवतात,अशा स्त्रियांची अव्हेलना कुणीही करू नये म्हणून महिला दिन साजरा केला पाहिजे.
दुसरे असे ज्या महान क्रांतिकारक स्त्रियांनी तुमच्या आमच्या उज्वल भविष्यासाठी महान कार्य केले त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सुध्दा आपण जागतिक महिला दिनाकडे बघतो आहे.
महाराष्ट्र राज्यातील कल्याणकारी लोकराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता माॅ जिजाऊ,स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,यांचे महान असे इतिहासिक कार्य म्हणजे आजच्या आयाबहिनींचे फुलले यशस्वी जीवन होय.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील कर्मभूमीत झाला नसता तर आजच्या भगिनीं ह्या गुलामगिरीचे जिवन कंठत असत्या हेही तितकेच खरे आहे.म्हणूनच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारत देशातील समस्त स्त्रीयांच्या उन्नतीची दिशा आहेत.
****
माता भगिनींनो शेवटी मी एवढेच म्हणेन..
👇👇
“तुझ्या उत्तुंग भरारी पुढे…
गगनही ठेंगणे असावे…
“तुझ्या विशाल पंखाखाली…
विश्व ते सारे विसावे..
विश्व ते सारे विसावे..
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹