
युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
रमाबाई आंबेडकर पार्क प्रतिष्ठान शाखा येवदा विद्यमाने त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर यांची 127 वी जयंती रमाबाई पार्कमध्ये मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी रमाबाई महिला संगठन तर्फे ” बेटी पढाव बेटी बचाव” अंधश्रद्धा महिला वरील वाढत्या अत्याचार चिंतेचा विषय यावर कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून रमाबाई आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व दर्यापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती रामेश्वर इंगळे उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे ऍड विद्यासागर वानखडे, सौ. प्रतिभाताई राजेंद्र माकोडे सरपंच ग्रामपंचायत येवदा,अमानुका पठाण उपसरपंच, वैशाली पुरण मोहोड अरुण रायबोले ग्रामविकास अधिकारी, के. एल.सावळे, निलेश गणवीर, विनोद मेश्राम, नर्मदाताई गुणवंतराव मोहोड,तसेच व्यवस्थापन समिती सुनील मोहोड उपस्थित होते.
विविध कार्यक्रमानंतर गित गायनाचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रम यशस्वी पार पडण्यास रमाबाई आंबेडकर जयंती पार्क समितीचे ,मुरलीधर बगाडे,पद्माकर थोरात, ज्ञानेश्वर मेश्राम, देवेंद्र सरदार, सुभाष पडघामोल,भूषण खडे,राजू गजभिये,रवींद्र खंडारे, सुरेश गवळी, राजू मेश्राम, किरण खडे, बंटी मोहोड,सुखदेव धांडे, राजू मोहोड,रतन पडघामोल,सुरेश गवळी, विलास मोहोड,उरण मोहोड,नागसेन मोहोड,करण मोहोड,सुरेश मोहोड,आर के मोहोड,ऍड विकास पडघामोल,ऍड मनोज सरदार, देवचंद टोबरे,रविंद्र मोहोड,गणेश इंगळे, सुनील घनबहादूर,पंजाबराव मोहोड,सिद्धार्थ मोहोड,शेषराव मोहोड,पिंटू धांडे,पंजाबराव खंडारे, भिमराव गजभिये, प्रभाकर थोरात, अमोल थोरात,अण्णा इंगळे, अमोल मोहोड,कुंदन मोहोड,बिरू मोहोड,शेषराव मोहोड,पिंटू धांडे,अशोक प्रभाकर, यांनी परिश्रम घेतले.