
युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
वंचित बहुजन आघाडी अमरावती पश्चिमच्या वतीने त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर जयंती दर्यापूर येथिल शासकीय विश्रामगृह येथे साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक अमरावती जिल्हा पश्चिम जिल्हाप्रमुख संजय चौरपगार उपस्थित होते. रमाबाई आंबेडकर यांच्या जिवनावर वीर उदाहरणे दिली रमाईंनी बाबासाहेबांची साथ दिल्यामुळे बाबासाहेब आपल्या सर्वांसाठी इतिहास घडू शकले.असे उदगार संजय चौरपगार यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती अमरावती जिल्हा पश्चिम विभागाचे महासचिव साहेबराव वाकपांजर, दर्यापूर तालुका प्रमुख सुरेंद्र तायडे, महिला आघाडी तालुकाप्रमुख आम्रपाली आठवले,शहर प्रमुख रिनाताई तायडे, सविताताई गावंडे, नंदाताई हंबर्डे, उमाताई हंबर्डे पद्माताई हंबर्डे, हर्षाताई इंगळे लक्ष्मीताई वाघमारे, कल्पनाताई सावळे, प्रा. चक्रे सर, प्रा. एस एस डोंगरे, जिल्हा सचिव अशोक दुधंडे, विनोद सोनवणे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाप्रमुख मुरलीधर रायबोरडे. श्रीकृष्ण पळसपगार, रामदास भाऊ वाकपांजर, सुनिल वाकपांजर, संजय दूधंडे, मनोज भाऊ जामनिक, माजी सरपंच, प्रभाकर चौरपगार,सुभाष घरडे, रविंद्र घरडे, देवानंद धांदे, एम.जी.थोरात, इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.