त्यागमुर्ती स्त्रिभुषण रमाई आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त पळसगाव (पिपर्डा) येथे अभिवादन!

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

   अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा पळसगांव तर्फे त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांची जयंती’ साजरी करण्यात आली.

          कार्यक्रमाच्या अध्यक्ष माहमाया महिला मंडळाच्या अध्यक्षा जयवंता रामटेके होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव लता खोब्रागडे,ग्रामपंचायत सरपंच सरीता गुरनुले,ग्रामपंचायत सदस्य हपिज शेख,पळसगांवचे पोलीस पाटिल रागिना दडमल,संपत येससुरे,अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखेचे सचिव कन्निलाल ढोक,प्रामुख्याने उपस्थित होते.

       मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन त्यागमुर्ती स्त्रिभुषण रमाई भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले आणि मनःपूर्वक अभिवादन करण्यात आले.

       याचबरोबर मान्यवरांनी आदर्शवत रमाई भिमराव आंबेडकर यांच्या संघर्षमय जिवन कार्यावर मनोगतातंर्गत विविध अनुभवांना अनुसरून प्रकाश टाकला.

       जयंती उत्सव सोहळ्याला बौद्ध उपासकं-उपासिका व गावातील नागरिक उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, प्रास्ताविक,आभारप्रदर्शन प्रदिप गजभिये यांनी पार पाडले.