
युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :-
मित्राला वाचविन्याच्या प्रयत्नात भारतीय लष्कर सेवेतील जवान रामतीर्थ जवळील पूर्णा नदीत पात्रात बुडाल्याची घटना दि. ८ रोजी सायंकाळी चार ते पाच वाजताच्या सुमारास रामतीर्थ येथे घडली.
गोपाल रामदास वानखडे वय अंदाजे 30 ते 32 वर्ष असे बुडालेल्या जवानाचे नाव असून आज गोपाल हा त्याचे मित्र विकास नागोराव सोनोने व विकी गौतम सोनोने यांच्या सोबत काही कामानिमित्य म्हैसांग येथे गेला होता.
परत येत असतांना रामतीर्थ गावाजवळ पूर्णा नदी पात्रात पोहण्यासाठी विकास सोनोने हा गेला असता तो पाण्यात बुडत असतांना त्याला वाचविण्यासाठी गोपाल वानखडे गेला. मात्र मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात तो स्वतः पाण्यात बुडाला.
विकास सोनोने यास अकोला येथे जिल्हा रुग्णालय स्थानांतर करण्यात आले आहे.
घटनेची माहिती तहसिलदार, येवदा पोलिस, जिल्हा बचाव शोध पथकास देण्यात आली. उशीर झाल्याने शोध पथक घटनास्थळी दाखल झाले नव्हते.