
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
पुर्व विदर्भात धानाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया विदर्भातील अन्य बहुतेक जिल्ह्यात धानाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यांना सुल्तानी संकटाचा सामना करावा लागतो. कारण काही तालुक्यांना निसर्गाच्या भरोशावर शेती करावी लागते. कारण चिमुरमध्ये शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी व्यवस्था नाही सर्व निसर्गाच्या भरोशावर आहे.
पाऊस वेळेवर आणि बऱ्यापैकी आल्यास शेतकरी मशागतीच्या कामाला सुरुवात करते पर्हे भरतात रोवनी करतात.
धानाचे उत्पादन घेतात मात्र धान विकायच्या वेळेस शेतकऱ्यांची नस दाबल्या जाते.धानाचे भाव पाळुन ठेवल्या जाते कारण मार्च एंडीग असते बहुतेक शेतकरी सोसायटी चा कर्जबाजारी झाला आहे.हे हेरून धानाचे भाव पाळुन ठेवल्या जातात हा अंदाज खरा ठरला आहे. कारण निवडणूका झाल्या आहेत नीसटलेले आहे असी शेतकरी वर्गात मोठी चर्चा आहे.
धानाचे भाव पाडून ठेवल्याने सरकार प्रती शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मागच्या वर्षी या महीन्यात ३२०० ते ३३०० रु प्रति क्विंटल धानाला भाव मिळाला होता. या वर्षी २८०० रु याच महिन्यात धानाचे भाव स्थिर का नाहीत जनतेनी निवडलेली ही सरकार स्थिर आहे परंतु शेतमालाचे भाव अस्थिर का ठेवण्यात आले आहे हे कळायला मार्ग नाही.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालावर उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.