मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याच्या सरकारी निर्णया विरोधात आणि जातनिहाय जनगणनेसाठी 11 फेब्रुवारीला वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर “ओबीसी एल्गार मोर्च्याचे” पिवळे वादळ धडकणार….

    रोहन आदेवार

साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी

यवतमाळ/वर्धा 

 वणी:– सरकारने OBC(VJ, NT, SBC) ची जातनिहाय जनगणना करावी तसेच मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा. या प्रमुख मागण्यासह इतर 18 मागण्या घेऊन OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती व महिला समन्वय समिती, वणी, मारेगाव, झरी, जि.यवतमाळ च्या वतीने वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर “ओबीसी एल्गार मोर्चा” चे रविवार, दि. 11 फेब्रुवारी 2024 ला दुपारी 12:00 वाजता आयोजन केलेले आहेत.

     मागील अनेक वर्षांपासून केंद्र सरकारने ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी, ही प्रमुख मागणी जातनिहाय जनगणना कृती समिती करीत आहे;परंतू आतापर्यंत केंद्र व राज्य सरकारने ठोस पावले उचलली नाहीत, तसेच मराठा समाजाच्या दबावापुढे झुकून मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याचा सरकारने घाट घातला आहे.ही बाब ओबीसीसाठी अन्यायकारक आहे.त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतमजूर-शेतकऱ्यांचे प्रश्न,सरकारी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समितीकडून सरकार विरोधात एल्गार पुकारलेला आहेत, तरी OBC(VJ, NT, SBC) प्रवर्गातील विविध जातसमूहाने आपल्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी आणि सामाजिक हितासाठी लाखोंच्या संख्येने मुलाबाळासह, सहकुटुंब-सहपरिवार,आप्तस्वकीय, नातेवाईक व मित्रमंडळीसह एल्गार मोर्च्यात सहभागी व्हावे, असे आवाहन OBC(VJ, NT, SBC)जातनिहाय जनगणना कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहेत.

     मोर्च्याची सुरुवात व समारोपसुद्धा शासकीय मैदान, पाण्याच्या टाकीजवळ, वणी येथेच होणार आहेत आणि समारोपानंतर मोर्च्याचे रूपांतर सभेत होऊन सभेला प्रसिध्द वक्ते तथा ओबीसी विचारवंत प्रा. डॉ. लक्ष्मण यादव, दिल्ली हे संबोधित करणार आहेत. सभेनंतर ओबीसी शिष्टमंडळातर्फे मा.उपविभागीय अधिकारी, वणी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहेत.

     हा एल्गार मोर्चा कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही एका संघटनेचा नसून आपल्या ओबीसी समाजाच्या न्याय, हक्क-अधिकारासाठी असून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आहेत,याची सर्व OBC(VJ, NT, SBC) प्रवर्गातील समाजबांधवानी नोंद घ्यावी, असे आवाहन “ओबीसी एल्गार मोर्च्या”च्या आयोजकांनी केलेले आहेत.