प्रितम जनबंधु
संपादक
हरदोना खुर्द त. राजुरा जि. चंद्रपूर येथील जुन्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात तारीख ७ फेब्रुवारी २०२४ रोज बुधवारला सायंकाळी साडेसात वाजता माता रमाई अर्थात रबाबाई भीमराव आंबेडकर जयंती साजरी फार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमांचे अध्यक्ष रिपब्लिकन चळवळीचे तथा धम्म आपल्या दारी या अभियानाचे प्रचारक अशोककुमार उमरे, गडचांदूर हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मादगी समाज संघटना जिल्हाध्यक्ष शंकर पेगडपल्दीवार, हरदोना ग्रामपंचायतीचे उपसरपंच एकनाथ मुठ्ठलकर, अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे गडचांदूर शहर अध्यक्ष सत्यपाल गौरकार, ग्रामपंचायत सदस्या ज्योती शिवाजी धोंगडे, रेश्माताई खोब्रागडे, मारोती झोडे, उपरवाही, नामदेव चुनारकर, संघपाल उमरे इत्यादी विचार मंचावर उपस्थित होते.
पटांगण सुशोभित करण्यासाठी आयु. धरती सरोदे यांनी सुंदर आणि सुबक, आकर्षक रांगोळी काढली. सामुहिक बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमांची सुरूवात आली.
कार्यक्रमांचे प्रास्ताविक अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे यांनी केले.
संचालन व आभारप्रदर्शन दिनेश गायकवाड यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रणय रमेश उमरे, संघपाल नारायण उमरे, मारोती झोडे, नामदेव चुनारकर, विनोद पांडुरंग उपरे, संविधान सतिश शिंदे, सम्यक दिनेश गायकवाड, दीक्षा दिनेश गायकवाड, वंदना महादेव दुर्गे, माधुरी जैन दुर्योधन, आरती सुरज उपरे, दिव्या राकेश खेडेकर, धरती रिंकू सरोदे, केशर सुधाकर कातकर, सुनंदा सतीश शिंदे, संजीवनी प्रमोद पेरगार, रेश्माताई विजय खोब्रागडे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.