राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
नुकतेच उपविभागीय अधिकारी (महसूल) तथा तहसीलदार यांचे कुरखेडा येथील कार्यालय परिसरात नो पार्किंगच्या जागेवर टुव्हीलर उभी ठेवण्याच्या प्रकार घडला होता.
त्या बाबत दखल न्यूज भारत ने बातमी प्रकाशित केली होती.त्या बातमी मुळे महसूल प्रशासनाने पाऊल उचलले असुन,त्या नो पार्किंगच्या लहान फलका एवजी कार्यालय परिसरात येनाऱ्या अभिभावकाना दिसेल असे मोठे फलक लावले.
नो पार्किंगच्या जागेवर गाड्या उभ्या ठेवताना आढळून आले असता त्या गाडी मालकवर २०० रु दंड आकारण्यात येईल,रक्कम वसूल करण्यात येईल असे म्हटले आहे.
या मुळे नो पार्किंगच्या जागेवर गाड्या उभ्या ठेवणाऱ्या प्रकारावर आळा बसेल.