प्रतिनिधी//प्रलय सहारे
वैरागड : – येणाऱ्या एप्रिल महिन्यात अमरावती येथे होऊ घातलेल्या रिपब्लिकन क्रांती परिषद घेण्यात येत असलेल्या चळवळीतील कार्यकर्ते यांचे सोबत अमरावती येथील (टी. व्ही. नाइन) TV9चे प्रतिनिधी पत्रकार सुरेंद्र आकोडे यांनी दि. ०४ फेब्रुवारी २०२३ रोजी सदिच्छा भेटी घेऊन चर्चा संवाद साधला.
एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील अमरावती येथे रिपब्लिकन क्रांती परिषद घेण्यात येत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात सामील होण्यासाठी परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात जास्तीत-जास्त भारतीय जनता सामील व्हावे यासाठी अमरावती येथील (टी. व्ही. नाइन) TV9चे प्रतिनिधी पत्रकार सुरेंद्र आकोडे यांनी सदिच्छा भेट घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संविधान आणि बाबासाहेबांनी भारतीय जनतेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात सामील होण्यासाठी आवाहन केलेले खुले पत्र पुस्तिका भेट देण्यात आली. त्याचप्रमाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात संविधानानुसार पक्षाची वाटचाल करण्याच्या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रचारक अशोककुमार उमरे गडचांदूर, चंद्रपूर आणि देवानंद लांजेवार अमरावती यांनी सविस्तर चर्चा करून होणाऱ्या रिपब्लिकन क्रांती परिषद यशस्वी करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पक्षात लोकशाही निर्माण करून संविधानानूसार वाटचाल करण्यासाठी पत्रकार सुरेंद्र आकोडे यांनी सुद्धा सहर्ष सहकार्य देण्याचे मान्य केलेले आहे.