युवराज डोंगरे
खल्लार/प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बेलोरा पंचायत समिती दर्यापुर येथुन नुकतेच दि.३१जानेवारी २०२३ ला सेवानिवृत्त झाले त्या निमित्याने आमदार बळवंत वानखडे यांच्या कार्यालयामध्ये सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने व सर्व संघटनेचे अध्यक्ष सचिव व पदाधिकारी यांच्या उपस्थित योग गुरु गणेश रामेकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी अखिल महारष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष पंडीतराव देशमुख तालुका अध्यक्ष सतिश वानखडे, तालुका सरचिटणीस डी.आर.जामनिक, तसेच जेष्ठ मार्गदर्शक संजय साखरे, तसेच शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष तुळशिदास धांडे, सचिव नंदकिशोर रायबोले ,जिल्हाउपाध्यक्ष दत्तात्रय रहाटे , कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष पदमाकर खाडे, सचिव स्वयरुप नवरे , धनपाल गजभिये, ईश्वरदास खंडारे बापुराव कु-हाडे, सत्यपाल खडे,, गजानन सोळंके , तसेच उर्दु शिक्षक संघटनेचे मो.शकील, मोहम्मद इर्शाद ,शराफतउल्ला सर मोहम्मद अजान ,मो.सिद्दीकी, तसेचे पदविधर संघटनेचे अध्यक्ष अशोक बावनेर, जुनी पेन्शन संघटनेचे तालुका अध्यक्ष किशोर बुरघाटे, बाळकृष्ण सोळके व इतर सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.