छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धेत सलग सातव्यांदा चॅम्पियन…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक 

           संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन पुरुष स्पर्धेचे आयोजन 2 ते 4 जानेवारी दरम्यान करण्यात आले होते.

           छत्रपती शिवाजी कला महाविद्यालयाने सर्वप्रथम दोन संघावर मात करून उप उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला त्यानंतर उप उपांत्य फेरीत प्रो. राम मेघे इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा संघावर एकतर्फी 35-14 व 35-17 अश्या सरळ दोन सेट मध्ये विजयी होऊन उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती संघावर सुद्धा सरळ दोन सेट मध्ये 35-12, 35-16 मात करीत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

            अंतिम फेरीमध्ये श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती संघावर सरळ दोन सेट मध्ये 35- 20, 35-18 मात करत सलग सातव्यांदा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

              विजयी संघामध्ये संकेत राखोंडे, स्वराज बरगट, भूषण गायगोले, सौरभ राखोंडे, प्रफुल पचारे, गौरव राजस, ओम पांडे, विशाल बोबडे, आर्यन पठाण व पियुष तायडे यांचा समावेश होता. 

            संघातील विजयी खेळाडूंनी आपल्या या सातत्यपूर्ण यशाचे श्रेय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चूभाऊ कडू, संस्थेचे सचिव भैयासाहेब कडू, माजी प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे, कार्यकारी प्राचार्य डॉ. रविंद्र इचे, प्रशिक्षक डॉ. हरीश काळे, अशोक बिजवे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिले आहे.