अबोदनगो चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
या बैठकीत मुख्यत्वे खासदार महोदयांनी शिक्षण,आरोग्य,कृषी, पाणीपुरवठा व विद्युत पुरवठा या विभागांचा आढावा घेतला.
यावेळी उपस्थित नागरिकांनी आपल्या समस्या खासदार बळवंतभाऊ वानखडे यांना सांगून आपल्या विविध मागण्यांचे निवेदन खासदार महोदयांना दिले.
याप्रसंगी खा.बळवंतभाऊ वानखडे यांनी अधिकाऱ्यांना जनतेच्या कामांना प्राधान्य देऊन ती जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात.
यावेळी प्रामुख्याने – प्रदिप शेवाळे (तहसीलदार धारणी),श्री.भिलावेकर (गटविकास अधिकारी धारणी),श्री.महेंद्रभाई गैहरवाल (माजी सभापती जि.प. अमरावती),श्री.दयारामजी काळे (माजी सभापती जि.प.अमरावती), श्री.राहुल येवले (उपसभापती कृ.उ.बा.स. धारणी) ,श्री.पंकज मोरे (जिल्हाध्यक्ष व काँग्रेस अमरावती) यांच्या सह पंचायत समिती धारणीचे सर्व विभागांचे अधिकारी,कर्मचारी तसेच धारणी शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक आढावा बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.